नर्सेस करिता विशेष प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 30, 2021
- 828
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत वन प्रशिक्षण संस्था, शहापूर यांच्या माध्यमातून आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गासाठी प्रशासकिय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांविषयक कायद्याचेही प्रशिक्षण देण्यात आले.
आपण करीत असलेल्या कामामध्ये अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचार्यांसाठी प्रशासकीय कामकाजाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात असून यामधील ज्ञानाचा उपयोग दैनंदिन कामकाजात करावा आणि कामाला गती द्यावी अशा शब्दात अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वन प्रशिक्षण संस्था शहापूर येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर शर्मा, सहाय्यक अधिकारी उमेश गावकर आणि प्रशिक्षक व्याख्याते प्रकाश मोहिते, डॉ. अशोक सावंत व एस.जी.पारधी उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये 4 सत्रात ‘ताणतणाव व्यवस्थापन, संवाद कौशल्य, सरकारी कर्मचारी यांचे व्यक्तिमत्व’, महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2013 व विशाखा समिती या विषयांवर 2 सत्रे घेण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 बाबत 2 सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai