नवी मुंबईत रंगला डायडेम महाराष्ट्र सौंदर्यस्पर्धेचा अंतिम सामना
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2021
- 1053
मिसेस यशिका ढोले व मिस सृष्टी बन्नाट्टी यांनी पटकावला विजयी मुकूट
नवी मुंबई ः डायडेम मिस व मिसेस महाराष्ट्र सौंदर्यस्पर्धेचा अंतिम सामना वाशीतील फोर पॉईंट हॉटेल येथे मोठ्या दिमाखात पार पडला. महाराष्ट्रातील विविध शहरातून 47 सौंदर्यवतींनी यात सहभाग नोंदविला होता. यापैकी मिस सृष्टी बन्नाट्टी तर मिसेस यशिका आशिष ढोले यांनी मानाचा विजयी मुकूट पटकावला.
नवी मुंबई शहर ज्या प्रमाणे स्वच्छतेचा बाबतीत देशात अग्रेसर आहे त्याच प्रमाणे या ठिकाणी होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा विविध राज्यांचे लक्ष वेधून घेतात. डायडेम सौंदर्य स्पर्धेच्या आयोजिका अमिषा चौधरी यांनी सुद्धा राज्यस्तरीय डायडेम मिस व मिसेस महाराष्ट्र सौंदर्यस्पर्धा आयोजित करण्याकरीता नवी मुंबईची निवड केली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरातून सौंदर्यवतींनी सहभाग नोंदविला. बुधवारी हि स्पर्धा वाशीच्या फोर पॉईंट हॉटेल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून मासिक सत्य या बाबत समाज प्रबोधनचा विडा उचलण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यार्या सौंदर्यवती यांच्यावतीने सॅनेटरी पॅड्स या गरजू महिलांना वाटप करुन जनजागृती केली जाते. संपूर्ण राज्यातून मिसेस या श्रेणीत 32 तर मिस या श्रेणीत 15 सौंदर्यवतींनी अंतिम फेरीत सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे बुद्धिमत्ता, सौंदर्य व आत्मविश्वास या गोष्टी लक्ष्यात घेऊन विविध टाइल्स सुद्धा प्रधान करण्यात आली. आयोजिका अमिषा चौधरी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले कि या स्पर्धेत बाह्य दिसण्यावरून नसून हृदयाची सुंदरता किती सखोल आहे ते बघितले जाते. त्यामुळे सौंदर्यवतींना विविध प्रश्न विचारून त्यांची समाजाप्रती किती आपुलकी आहे हे आम्हाला व परीक्षकांना समजते. महाराष्ट्रातील महिलांना स्वतःला सिद्ध करण्याकरिता आम्ही एक व्यासपीठ निर्माण केले आहे.
ब्युटी विथ परपज हा बहुमान पुण्याच्या सुवर्णा झोरे यांनी पटकावला. मिसेस या श्रेणीमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे वर्षा नाईक व स्मिता ठाकरे या राहिल्यात तसेच मिस या श्रेणीमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे पुनम महाराणा आणि पूनिता भारद्वाज या विजयी झाल्यात. अटीतटीच्या या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून बातुल अली, आर्यना ग्रेवाल, अर्चना चौधरी, निकिता जगताप व संजीव कुमार यांनी आपली जबाबदारी पार पाडली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai