अखेर एलबीटी विभागात खांदेपालट
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2021
- 673
33 अधिकारी-कर्मचार्यांच्या बदल्या
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेतील स्थानिक संस्था कर विभागात भ्रष्टाचाराच्या घटना उघड होत आहे. वर्षानुवर्ष या विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचार्यांकडूनच हे प्रकार घडत असल्याने त्यांच्या बदल्यांची मागणी सुरु होती. लाचलुचपत विभागाने महिनाभरात लाचप्रकरणी तीन कर्मचार्यांना रंगेहाथ पकडल्याने अखेर पालिका आयुक्तांनी एलबीटी विभागातील 33 जणांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे एलबीटी विभागात खांदेपालट झाली असली तरी अँटी करप्शन विभागाच्या चौकशीतून किती भ्रष्ट अधिकार्यांची नावे पुढे येतात हे येणार काळच ठरवेल.
पालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागात वर्षानुवर्ष घोटाळा सुरु असल्याची तक्रार याच विभागातील कर्मचार्याने पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली होती. मात्र त्याकडे कानाडोळा करुन कोणतीही कारवाई पालिकेने केली नाही. मात्र ‘आजची नवी मुंबई’ने संबंधित घोटाळ्यावर प्रकाश टाकून या विभागातील अधिकार्यांच्या 20 वर्षांपासून बदल्या का नाही झाल्या? असा सवालही उपस्थित केला होता. या घोटाळ्याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या आयुक्तांनी तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित विभागातील साफसफाई करण्याचे आदेशही उपायुक्त प्रशासन विभागाला दिले. दरम्यान, महिनाभरात लाचलुचपत विभागाने दोन प्रकरणात तीन अधिकारी व कर्मचार्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने एलबीटी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून येथील अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यांची मागणी जोर धरु लागली. अखेर आयुक्तांनी 12 नोव्हेंबर रोजी या विभागातील 33 अधिकारी व कर्मचार्यांच्या इतर विभागात बदली केली आहे. 31 नवीन अधिकारी व कर्मचार्यांची तात्पुरत्या स्वरुपात स्थानिक संस्था कर विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागात 20 वर्षापासून कार्यरत असणार्या अधिक्षक वसूली अधिकारी सुखदेव येडवे यांच्याकडे वाशी विभाग कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त या पदाचा कार्यभार सोपवला आहे. सार्वजनिक सेवेच्या हितार्थ या बदल्या केल्याचे आदेशात नमुद केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai