महामार्गावरील दिवाबत्ती सुविधा महापालिकेकडे
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 10, 2021
- 444
सार्वजनिक विभागाकडून सुविधेचे पालिकेकडे ह्स्तांतरण
नवी मुंबई ः सायन-पनवेल महामार्गावर नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील विद्युत पथदीप दुरुस्ती व देखभालीसाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावेत अशी मागणी पालिकेने सातत्याने केली होती. याची दखल घेऊन वाशी टोलनाका ते कोकण भवन या रस्त्यावरील सर्व पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, विदयुत यंत्रणा व विदुयत मीटर सार्वजनिक बांधकाम विदयुत विभागाकडून पालिकेकडे हस्तांतरित करण्यात येत असल्याचे पत्र आयुक्तांना दिले आहे.
सायन पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने येथील आवश्यक सुधारणांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेस सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत आहे. पथदिवे अनेकदा बंद असल्याने वाहन चालकांची व नागरिकांची गैरसोय होत होती. परिणामी या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांच्या रोषाला नवी मुंबई महानगरपालिकेलासामोरे जावे लागते. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाशी टोलनाका ते कोकण भवन या भागातील सर्व पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावेत याविषयी महानगरपालिका आग्रही भूमिका मांडत होती. याबाबत महापालिका व शासन स्तरावर वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या. याबाबत 15 सप्टेंबर 2021 रोजी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संबंधित अधिकार्यांची संयुक्त बैठक होऊन त्यामध्ये निर्देशित करण्यात आल्याप्रमाणे या पथदिव्यांची दोन्ही प्राधिकरणांमार्फत संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यानुसार वाशी टोलनाका ते कोकण भवन या सायन-पनवेल रस्त्यावरील सर्व पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, विदयुत यंत्रणा व विदुयत मीटर नवी मुंबई महानगरपालिकेकडे सार्वजनिक बांधकाम विदयुत विभागाकडून हस्तांतरीत करण्यात आलेले आहेत. पथदिवे हस्तांतरीत करण्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीकरिता लागणार्या अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक महानगरपालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागास देण्यात आले होते.
सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागामार्फत याबाबतची पडताळणी करण्यात येऊन रु. 8 कोटी 29 लक्ष इतकी रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावरील पादचारी भुयारी मार्ग, नेरुळ येथील दोन पादचारी भुयारी मार्ग व एसबीआय कॉलनी येथील भुयारी मार्ग असे एकूण 4 पादचारी भुयारी मार्ग हे देखभाल व दुरुस्तीकरीता नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत.
- पालिकेकडे पथदिवे हस्तांतरीत करण्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीकरिता लागणार्या अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाकडे दिले होते.
- सार्वजनिक बांधकाम विदुयत विभागामार्फत पडताळणी करण्यात येऊन रु. 8 कोटी 29 लक्ष इतकी रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात आले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai