स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2021
- 364
सहभागी होण्याचा कालावधी 15 ते 31 डिसेंबर 2021
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत केंद्रीय गृह निर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत समृध्द पर्यावरण साकारण्यासाठी ‘स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज घोषित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फतही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार ‘नवी मुंबईचे स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चॅलेंज’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या चॅलेंजमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक विद्यार्थी, शिक्षण संस्था,विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक समुह, नवे लघुउद्योजक,तांत्रिक व अतांत्रिक कॉर्पोरेट्स हे आपल्या स्वच्छताविषयक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांसह सहभागी होऊ शकतात. या चॅलेंजनुसार अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून स्वच्छता कार्यात सुधारणा घडवून आणणार्या नव्या संकल्पनांची निर्मिती करणे आणि या स्वच्छता संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग समाज, वॉर्ड व शहर पातळीवर करणे हे उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने नजरेसमोर ठेवले आहे. यामधून स्वच्छता विषयक नवनव्या संकल्पनांचा उदय होईल व शहर स्वच्छता कार्याला लोकसहभागातून अधिक गतीमानता लाभेल. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांकडून कचरा वर्गीकरण कचरा संकलन, कचर्याची विल्हेवाट, कचर्यापासून खतनिर्मितीशून्य कचरा (कचरा कमी करणे), कचर्यावर पुनर्प्रक्रिया, कचर्यापासून पुनर्निमिती, प्लास्टिक कचर्याचे सुयोग्य व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा, लोकसहभाग वाढीकरिता संकल्पना अशा कचरा व स्वच्छतेशी संबंधित विविध बाबींवरील नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्प सादर केले जाणे अपेक्षित आहे. या स्पर्धेमध्ये सहभागाकरिता नागरिकांनी ऑनलाईन गुगल फॉर्मची लिंक ीर्हेीींीीश्र.रीं/ळर्क्षीकज यामध्ये माहिती भरावयाची आहे. त्यासोबतच स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्पाची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रकल्पाला पूरक छायाचित्रे, व्हिडिओ छायाचित्रीकरण, पीपीटी (प्रत्येकी 1 एमबी क्षमतेच्या जास्तीत जास्त 5 फाईल्स मर्यादा ) अर्जासमवेत अपलोड करावयाच्या आहेत. स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक संकल्पना चॅलेंजमध्ये सहभागी होण्याकरिता 15 ते 31 डिसेंबर 2021 हा कालावधी जाहीर करण्यात आलेला आहे. या चॅलेंजमध्ये सर्वोत्तम तांत्रिक संकल्पना सादर करणार्या पहिल्या 3 क्रमांकाना रु. 1 लक्ष, रु. 50 हजार,रु. 25 हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान केली जाणार आहेत. तसेच अंतिम फेरीसाठी निवडल्या जाणार्या स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर अंतिम निवड झाल्यास केंद्र सरकारमार्फत प्रकल्प अंमलबजावणीसाठी रू. 25 लक्ष रक्कमेचे सीड फंडींग केले जाणार आहे.
परीक्षण करताना या बाबींचा होणार गुणात्मक विचार
- संकल्पनेची नाविन्यपूर्णता
- सद्यस्थितीत सुरू असलेल्या कार्यवाहीमध्ये संकल्पना राबविल्यास अपेक्षित सकारात्मक बदल
- संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची क्षमता
- संकल्पना राबविण्यासाठी व्यावहारिक मूल्यांकन
- संकल्पनेचे उपयोगिता मूल्यांकन
- संकल्पना राबवावयाची झाल्यास त्यासाठी लागणार्या साहित्याची उपलब्धता
- संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा कालावधी
- अशा विविध बाबींचा गुणात्मक विचार करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai