लोकन्यायालयात 334 प्रकरणे निकाली
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 16, 2021
- 587
नवी मुंबई : न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेवून लोक न्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयाच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. या पार्श्वभूमीवर वाशी न्यायालयात लोक इदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याम्ये 334 प्रकरणे निकाली लागली असून 46 प्रकरणे दाखल होण्यापुर्वीच तडजोड करुन 4 कोटी 43 लाखांची वसुली संबंधि संस्थेने केली आहे. या लोकअदालतीमध्ये 44 खटल्यांचा ऑनलाईन निकाल देण्यात आला.
दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे खटले मिटवण्यासाठी वेळोवेळी लोक अदालतीचे आयोजन केले जाते. त्यानुसार वाशी न्यायालय व तालुका विधि विभाग यांच्यावीने 11 डिसेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य न्यायाधीश व विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तृप्ती देशमुख-नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गणेश शिंदे, विनीत शिरसाठी यांनी या लोकअदालतीचे कामकाज पाहिले. त्याकामी नवी मुंबई वकील बार असोसिएशनच्या वकीलांनाही सहकार्य केले. या लोकअदालतीमध्ये एकूम 334 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी 44 खटल्यांवर ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. विविध बँका, महावितरण व इतर संस्थांची 46 प्रकरणे दाखल होण्यापुर्वीच सामंजस्याने निकाली काढून4 कोटी 43 लाख रुपयंाची वसुली करण्यात आली.
- रायगडमध्ये 15 हजार 300 प्रकरणे निकाली
अलिबाग येथे झालेल्या लोकन्यायालयात तब्बल 15 हजार 300 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकूण 16 कोटी 74 लाख 77 हजार 089 रुपये मूल्य असलेली 1 लाख 2 हजार 250 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व 93 हजार 178 प्रलंबित प्रकरणापैकी 6 कोटी 98 लाख 91 हजार 776 रुपये मूल्य असलेली 14 हजार 425 प्रकरणे तसेच दाखल झालेली 9 हजार 072 प्रलंबित प्रकरणापैकी 9 कोटी 75 लाख 85 हजार 313 रुपये मूल्य असलेली 875 प्रकरणे अशी एकूण 1 लाख 2 हजार 250 पैकी 15,300 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली व त्यातून पक्षकारांना एकूण 16 कोटी 74 लाख 77 हजार 089 रूपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai