जपानमध्ये काम करण्याची संधी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 17, 2021
- 737
नवी मुंबई ः नर्सिंग क्षेत्रात कुशल असणार्या व परदेशात विशेषत: जपान सारख्या आधुनिक व तांत्रिकदृष्टया प्रगत देशात जावून काम करु इच्छिणार्या उमेदवारांसाठी 22 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 या कालाविधीत निर्दिष्ट कुशल कामगार कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान सुगा योशीहिदे यांच्या 23 सप्टेंबर 2021 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या बैठकीत उत्पादन, एमएसएमई आणि कौशल्य विकासामध्ये द्विपक्षीय भागीदारी विकसित करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती. याबाबत भारत व जपानमध्ये निर्दिष्ट कुशल कामगार कार्यक्रम SSW बाबत करार करण्यात आला आहे. जपान येथे नोकरी करण्यास इच्छुक भारतातील युवक/युवतींकरिता जपानतर्फे कौशल्य आणि भाषा चाचणी घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम जपान मधील विविध क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात येत असून, या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील जपानी कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये नर्सिंग, ईमारत साफसफाई व्यवस्थापन, कच्चा माल उद्योग, मशिनरी निर्माण उद्योग, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक सूचना संबंधित उद्योग, बांधकाम उद्योग, जहाज निर्माण आणि समुद्री उद्योग, वाहन दुरुस्ती व देखभाल उद्योग, विमान उड्डाण उद्योग, आवास उद्योग, कृषी उद्योग, मत्स्यपालन, खाद्य आणि पेय निर्माण उद्योग, भोजनालय व्यवसाय या क्षेत्रातील उद्योगांचा समावेश असणार आहे. या क्षेत्रांपैकी नर्सिंग क्षेत्रातील जपानमध्ये उपलब्ध होणार्या नोकरीच्या संधीची माहिती देण्यासाठी22 डिसेंबर 2021 रोजी SSW कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये विविध कंपन्यांव्दारे त्यांच्या कंपनीची माहिती देण्यातयेईल. याकार्यक्रमात सहभागी होणार्यायुवक/युवतींना जपान कंपनीच्या प्रतिनिधी / कर्मचार्यां सोबत प्रश्नोत्तरे आणि संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याकार्यक्रमांतीलविषयसविस्तरपणे समजण्यास सुलभ होण्यासाठी या कार्यक्रमाच्या चित्रफीती मध्ये तागालोख, खमेर, नेपाली, मंगोलियाई, इंडोनेशियाई, विएतनामी , थाई, सिंहल, उज्बेक व हिंदी या 10 भाषांमध्ये उपशीर्षक उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. भविष्यात डडथ टेस्ट देणार्या युवकयुवतींना सुध्दा या कार्यक्रमात सहभागी होतायेणारआहे. तसेच विशिष्ट कुशल कामगार रुपात काम करु इच्छीणार्या उमेदवारांना देखील या कार्यक्रमामध्ये भाग घेता येईल. Specified Skilled Workers Programme (SSW)कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी त्यांच्या मोबईलवर LINEAPP डाऊनलोड करुन त्याद्वारे खालील क्युआर कोड स्कॅन करुन सहभाग नोंदवावा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai