स्वच्छ नवी मुंबईला भ्रष्टाचाराची झालर
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 28, 2021
- 1288
अधिवेशनात कामातील भ्रष्टाचाराची पोलखोल; सखोल चौकशी करुन कारवाईची मागणी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये संपुर्ण देशात पाचवे स्थान प्राप्त झाले आहे. मात्र हे स्थान मिळविण्यासाठी पालिकेने नियमांची पायमल्ली करुन संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप चालु हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी एका लक्षवेधीद्वारे केला आहे. तसचे या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषीं अधिकार्यांवर व त्यांना पाठिशी घालणार्या आयुक्तांवरही कारवाई करावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. धस यांनी केलेल्या पोलखोलमुळे विधीमंडळासह नवी मुंबईत खळबळ उडाली असून स्वच्छ सर्वेक्षणाला भ्रष्टाचाराची झालर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला पहिला क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. तसेच सुंपर्ण देशात नवी मुंबईने पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. यासाठी पालिकेने कोट्यावधीं रुपये खर्च केले आहेत. मात्र सध्या चालु असलेल्या हिवाळी अधिवेशात नवी मुंबईच्या स्वच्छ सर्वेक्षणावर बोट ठेवून हे स्थान प्राप्त करण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोेप विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचना मांडून केला आहे. पालिकेमार्फत नियमांची पायमल्ली करुन संगनमताने घनकचरा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी केंद्रिय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांविरुद्ध कामे करुन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणे, स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये भिंती रंगवण्यासाठी 3 ते 4 लाखाच्या कामाचे तुकडे करुन एका प्रभागात 3 कोटी रुपयांपर्यंतची कामे आयुक्तांच्या मान्यतेने निविदा न काढता करणे, कामे मार्च 2021 मध्ये संपवून 1 एप्रिल नंतर सदर कामांच्या निविदा प्रसिद्ध करुन त्याची बिले काढण्यात आली असल्याचे त्यांनी लक्षवेधीत नमुद केले आहे. तसेच घनकचरा विभागातील अधिकारी बाबासाहेब राजळे यांना तीन वेळा प्रतिनियुक्ती देण्यात आली असून गेल्या 13 वर्षांपासून ते या विभागात नियमबाह्यपणे कार्यरत आहेत. त्यांच्याकाळात घनकचरा विभागात साफसफाईचे कंत्राट देताना केंद्रिय दक्षात आयोगाचे मार्गदर्शक तत्वाविरुद्ध एका कामाची एक निविदा प्रसिद्ध न करता तुकडे करुन मर्जीतील कंत्राटदाराला कामे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी पालिका आयुक्तांकडे वारंवार तक्रारी होऊनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. उलट संबंधितांना संरक्षण देऊन त्यांनी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे सदर संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होवून जबाबदार दोषी अधिकार्यांवर व त्यांना जाणीवपुर्वक पाठीशी घालणार्या आयुक्तांवर कठोर कारवाई करण्याची कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. यामुळे स्वच्छतेच्या पडद्याआड नवी मुंबईत भ्रष्टाचार चालु असल्याची टिकाही होत आहे. संबंधित प्रकरणात शासन कोणती भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai