समीर वानखेडेंच्या ‘त्या’ बारचा परवाना रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 02, 2022
- 682
नवी मुंबई ः मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता ठाणे जिल्हाधिकार्यांनी परवाना मंजुरीसाठी वयाबाबत असलेल्या अटींचे उल्लंघन तसेच ते सज्ञान असल्याबाबतची सादर केलेली खोटी प्रतिज्ञापत्र यामुळे समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द करुन वानखेडे यांना आणखी एक झटका दिला आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. नवी मुंबईतील वाशी येथे असलेल्या सदगुरू रेस्ट्रो बारचा परवाना हा समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. समीर वानखेडे हे अल्पवयीन असताना त्यांना बारचा परवाना देण्यात आला होता असा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या नावावर हा बारचा परवाना झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. अल्पवयीन असतानाही बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीशीला दिलेल्या उत्तरातील अनुज्ञाप्ती मंजुरीसाठी वयाबाबत असलेल्या अटींचे उल्लंघन तसेच ते सज्ञान असल्याबाबतची सादर केलेली खोटी प्रतिज्ञापत्र याबाबी परवाना धोरणाच्या विरुद्ध असून कठोर शिक्षेस पात्र ठरतात. नोटीशीला वानखेडे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. तसेच त्यांनी सदर परवाना दिशाभूल करुन प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्याने ठाणे जिल्हाधिकार्यांनी त्यांचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे.
27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडेंच्या नावे बारचा परवाना काढण्यात आला होता. ते 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. मात्र बारच्या परवान्यासाठी किमान 21 वयाची अट आहे. असे असतानाही त्यांना बारचा परवाना मिळाला. समीर वानखेडे यांचे वडील त्यावेळी उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते. याप्रकरणी समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र समाधानकारक उत्तर न आल्याने तसेच दिशाभूल करुन सदर परवाना प्राप्त केल्याचे दिसून आल्याने हा परवाना रद्द करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai