माऊली कृपा सोसायटीत ‘परिवर्तन’
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 08, 2022
- 517
संचालक मंडळाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे पॅनेल विजयी
नवी मुंबई : माथाडी कामगारांची वस्ती म्हणून ओळख असलेली घणसोली येथील सेक्टर-7 मधील माऊली कृपा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनेल ने 17 पैकी 17 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत स्थानिक रहिवाशांनी ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या उन्नती पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारांनी नाकारल्यामुळे भाजपच्या नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
घणसोली मधील माऊली कृपा सोसायटीत निवडणूक आधी झालेल्या मारामारीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे द्वंद्व रंगले होते. या सोसायटीच्या पुनर्विकासाचा प्रश्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून सौरभ शिंदे यांनी मार्गी लावला आहे. ही बाब ऐरोलीतील भाजपच्या नेत्यांना खटकल्याने वाद उकरून काढल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. ही निवडणूक लागताच या निवडणुकीत राजकीय रंग चढला होता. कारण महाविकास आघाडीची कमान राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे यांनी सांभाळली होती. त्यांच्या जोडीला प्रचारासाठी मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी साथ दिली होती. निवडणूकीच्या दोन दिवस आधीच माघी गणेशउत्सवादरम्यान या सोसायटीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली होती. मात्र 6 तारखेला ही निवडणूक पार पडली आणि याचा निकाल लागला. त्यात महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनेल ने उन्नती पॅनलवर 17-0 असा दणदणीत विजय मिळवला आहे. रहिवाशांनी कोणत्याही गुंडगिरीला न घाबरता उन्नती पॅनलच्या सर्वच उमेदवारांना चारीमुंड्या चित केले.
परिवर्तन पॅनलचे सर्वच्या सर्व 17 उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आले. विजयी उमेदवारांमध्ये पोपट दहिफळे, धनंजय मोरे, भास्कर बहादूरे, संगीता खबले, संजना पार्टे, अमित जवळ, सुभाष साबळे, लक्ष्मण शेवाळे, अंकुश रांजणे, शंकर शेलार, अनिल सलामवाडे, शैलेश दुंदळे, अजित गोळे, उमेश चोरगे, संतोष जाधव, दिलीप गुळवे आणि दीपक सुर्वे आदींचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai