आता लक्ष आरक्षणाकडे
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2022
- 1095
सोमवारी ओबीसीसाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी मुंबई ः महापालिकेच्या 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना तयार करुन ती अंतिम मंजुरीसाठी राज्य निवडणुक आयोगाकडे पाठवली आहे. आरक्षण सोडतीसंदर्भात आयोगाकडून आदेश अपेक्षित असून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत होणार्या सुनावणीनंतरच आरक्षण जारी करण्याचे संकेत सुत्रांकडून मिळत आहेत. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडते या विचाराने ईच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 122 उमेदवार आपले नशीब आजमावणार असून त्यासाठी त्रिसदस्यीय 41 प्रभागांची रचना करण्यात आली आहे. प्रभाग रचनेवर सूचना व हरकती घेऊन त्याला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी सदर प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. त्यास मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, प्रभाग रचनेनुसार मतदार यादीच्या फोडाफोडीचे काम महापालिकेत युद्धपातळीवर सुरु असून पालिकेचे अनेक विभागातील कर्मचार्यांवर ही जबाबदारी दिली आहे. सर्वसाधारणपणे प्रभाग रचनेअगोदर जातनिहाय आरक्षणाची सोडत काढली जाते. नवी मुंबई महानगरपालिकेत 122 नगरसेवक असून त्यामध्ये 11 प्रभाग अनुसूचित जाती तर दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव असून 27 % आरक्षणानुसार 61 प्रभाग इतर मागास वर्गासाठी राखीव आहे. परंतु यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयाच्या कचाट्यात सापडल्याने अद्याप आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित राहिला आहे. त्याचबरोबर सर्व विभागात 50% आरक्षण हे महिलांसाठी राखीव आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनपर्यंत निकाली न निघाल्याने राज्य निवडणुक आयोगाने आरक्षणासाठी सोडत दिनांक जाहीर केलेला नाही. सोमवारी ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असून यात न्यायालय कोणता निर्णय देते यावरच ओबीसी आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे. त्याचबरोबर एका प्रभागात एक मागास प्रवर्गासाठी एकच आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याने 13 प्रभागांऐवजी आता त्याचा 39 प्रभागांना फटका बसणार आहे. त्यामुळे या विभागातून उभे राहणार्या ईच्छुक उमेदवारांमध्ये धाकधुकी वाढली आहे. दरम्यान, या प्रभागरचनेला न्यायालयात आव्हान देण्याचे अनेक पक्षांनी जाहीर केले असून त्यास न्यायालय कसा प्रतिसाद देते याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai