युलू सायकलबाबत बेफिकीर
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 12, 2022
- 665
नवी मुंबई ः शारिरीक तंदुरुस्तीच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्या तसेच पर्यावरणपुरक असल्याने इंधन बचत करण्याच्या हेतून नवी मुंबई महापालिकेने गेल्या तीन वर्षापासून युलू सायकल प्रकल्प राबविला आहे. याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र नागरिकांकडून या सायकलींचा वापर झाल्यावर त्या अस्ताव्यस्थ कोठेही सोडण्यात येत आहेत. यामुळे सायकलींचे नुकसान होत असल्याने प्रामाणिकपणे वापर करणार्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी या सायकलींचा वापर व्यवस्थित करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.
पर्यावरण, खाजगी वाहनांचा वाढता वापर, इंधन आणि नागरिकांचे आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिकेने 1 नोव्हेंबर 2018 साली युलू सायकल योजना शहरात सुरू केली. जनसायकल प्रणालीच्या माध्यमातून नवी मुंबईकरांनी 35 लाख कि.मी. फेर्या (राईड्स) केल्या असून या जनसायकल प्रणालीचा वापर करणारे नवी मुंबई हे भारतातील सर्वात जास्त प्रतिसाद देणारे शहर ठरले आहे. शहरात 600 सायकल 108 ई-बाईक्स प्रवासी सेवेत आहेत. यामधुन यावर्षी 38 कोटी 61 लाख ग्रॅम कार्बन क्रेडिट प्राप्त झाला आहे. नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला प्रतिसाद वाढत आहे. परंतू, काही बेफिकीर नागरिकांकडून मात्र या सायकलींचा वापर करून झाल्यानंतर त्या कुठेही व कश्याही उभ्या करण्याचा प्रकार वाढत आहे. कित्येक वेळा सायकल ढकलून दिल्या जात असल्याचे निर्दशनास आले आहे. सार्वजनिक संपत्ती ही आपली सुद्धा जबाबदारी असून तीचा व्यवस्थित वापर व योग्य काळजी घेतली गेली पाहिजे असे आवाहन महापालिकेतर्फ जरी केले जात असले तर पर्यावरणपूरक असणार्या या वाहनांचे महत्व काही बेफिकीर नागरिकांना कळून येत नसल्याचे या प्रकारांमधून उघडकीस येत आहे. ढकलून दिल्यामुळे या सायकलींचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी नागरिकांनी वापराबाबतच्या सूचनांचे पालन करणे गरजेच असल्याचे मत पालिका अधिकारी व सुजाण नागरिकांमधून होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai