भावे कट्ट्यावर जागतिक रंगभूमी दिन साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2022
- 747
नवी मुंबई : जागतिक रंगभूमी दिना निमित्ताने नवी मुंबईतील नाट्यकर्मींनी विष्णूदास भावे नाट्यगृह येथे रविवारी रंगभूमी दिन साजरा केला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे, मुकुंद महाले व रविंद्र औटी यांच्या हस्ते नटराज पूजन करुन रंगकर्मींना शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक पालवे, रंगराव घागरे, शशिकांत तुपे, कवि जितेंद्र लाड, वैभव वऱहाडी, करण अहिरे आणि इतर रंगकर्मी उपस्थित होते.
यावेळा मनोगत व्यक्त करताना रविंद्र औटी यांनी सांगितले की, आपण कीतीही मोठे झालोत तरी आपले पाय जमिनीवरच रहायला पाहिजेत. त्याचबरोबर येणार्या आगामी मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये जास्तीत जास्त नवी मुंबईतील कलाकारांना मी संधी देणार असल्याचे आश्वासन मुकुंद महाले यांनी दिले. तर नवी मुंबईतील रंगभूमी आणखीन सदृढ होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे यांनी दिले. यावेळी अनेक नव्या रंगकर्मींनी मनोगत व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai