बालनाट्य शिबीराचे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 18, 2022
- 705
नवी मुंबई ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई आणि संत शिरोमणी कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीहरी पवळे संचालित 19 एप्रिल ते 28 एप्रिल 2022 या कालावधीत विष्णुदास भावे नाट्यगृह येथे बालनाट्य शिबीराचे आयोजन केले आहे.
बालकलाकारांच्या सुप्तकला गुणांना संधी मिळावी आणि त्यातुन चांगले कलाकार व नाट्यरसिक घडावे ह्या उद्येशाने गेली 25 वर्ष सातत्याने श्रीहरी पवळे हे शिबीर घेवून मार्गदर्शन करीत आहेत. गेली दोन वर्ष या शिबीराला कोरोना मुळे खंड पडला होता. आता पुन्हा उत्साहाने बालनाट्य शिबीर सुरू होत आहे. नवी मुंबईतील बालकलाकारांनी या शिबीरात सहभाग घ्यावा. 19 ते 28 या कालावधीत सायं.5 ते 7 या वेळेत विष्णुदास भावे नाट्यगृह तालिम हॉलमध्ये हे शिबीर होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai