नाईकांच्या जामिनालाही तारीख पे तारीख
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2022
- 987
नवी मुंबई : भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामिनासंदर्भातील आदेश अपूर्ण असल्यामुळे गुरुवारीदेखील त्यांच्या जामीन अर्जावर ठाणे सत्र न्यायालयात निर्णय होऊ शकला नाही. मात्र, आज (ता. 30) यासंदर्भात निर्णय देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने नाईकांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत 27 वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन नाईक यांच्याविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच महिलेने नाईकांनी रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. ठाणे सत्र न्यायालयातील न्या. एन. के. ब्रह्मे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यावर गुरुवारी निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र नाईक यांच्या अटकपूर्व जामिनासंदर्भातील आदेश अपूर्ण राहील्यामुळे गुरुवारीदेखील त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय होऊ शकला नाही. जामिन अर्जांवरील निर्णय शनिवारी देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai