भूखंडांसह गाळे विक्रीच्या योजनेला मुदतवाढ
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2022
- 655
नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या 153 निवासी, 18 निवासी तथा वाणिज्यिक वापराच्या भूखंडांसह 275 वाणिज्यिक गाळे विक्रीच्या योजनेच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. अक्षय्य तृतीया तसेच रमजान ईदच्या प्रसंगी नागरिकांना या सुवर्णसंधीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता यावा यासाठी सिडकोतर्फे सदर योजनांना मुदत वाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडको महामंडळातर्फे 02 एप्रिल 2022 रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर तीन स्वतंत्र योजनांतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील 153 निवासी, 18 निवासी तथा वाणिज्यिक भूखंडांसह 275 वाणिज्यिक गाळे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. या मुदतवाढीमुळे नागरिकांना योजनेकरिता अर्ज करण्यास पुरेसा अवधी देखील प्राप्त होणार आहे. या अनुषंगाने अनामत रक्कम भरणा, बंद निविदा सादर करणे, ई-लिलाव प्रक्रियांसही मुदतवाढ देण्यात आली आहे. ऐरोली, घणसोली, नेरूळ, खारघर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये खास बंगल्यांकरिता 153 भूखंड, निवासी तथा वाणिज्यिक वापराचे 18 भूखंड उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच नवी मुंबईच्या विविध नोडमधील सिडकोच्या प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पांतर्गत तसेच व्हॅलीशिल्प आणि स्वप्नपूर्ती गृहसंकुलांतील एकूण 275 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. 153 निवासी वापराच्या भूखंडांकरिता अर्ज सादर करण्यास व अनामत रक्कम भरण्यास 06 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बंद निविदा सादर करण्यास 05 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-लिलाव प्रक्रियेस 6 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर योजनेचा निकाल 9 मे 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 18 निवासी तथा वाणिज्यिक वापराच्या भूखंडांकरिता अर्ज सादर करण्यास व अनामत रक्कम भरण्यास 6 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बंद निविदा सादर करण्यास 5 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-लिलाव प्रक्रियेस 6 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर योजनेचा निकाल 9 मे 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 275 वाणिज्यिक गाळ्यांकरिता अर्ज सादर करण्यास व अनामत रक्कम भरण्यास 17 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बंद निविदा सादर करण्यास 16 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-लिलाव प्रक्रियेस 17 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर योजनेचा निकाल 20 मे 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
कोविड - 19 च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक, विकासक आणि व्यावसायिकांना दिलासा मिळावा म्हणून भूखंड व वाणिज्यित गाळे विक्रीची महायोजना आणण्यात आली होती. या योजनेस मुदतवाढ दिल्याने अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या सुवर्णसंधीमुळे नागरिकांचा येत्या अक्षय्य तृतीयेचा आणि रमजान ईदचा आनंदही द्विगुणीत होणार आहे. -डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai