पालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार
- by Aajchi Navi Mumbai
- May 25, 2022
- 788
नवी मुंबई ः महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर मंगळवारी नवी मुंबईतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली. या वेळी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढण्याचा एकमुखी निर्णय झाला. मात्र या तीनही पक्षांच्या नेतृत्वाने अद्यापही नवी मुंबई निवडणुकीत आघाडी करून लढण्याबाबत घोषणा केलेली नाही.
कोविडमुळे गेले दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांना अखेर ऑक्टोबर महिन्याचा मुहूर्त मिळाला आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासन आणि निवडणूक विभाग कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीत नवी मुंबईतील राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. पावसाळ्यात बैठका आणि रणनीती आखण्यात अडथळा येऊ नये म्हणून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या नवी मुंबईतील नेत्यांनी पुन्हा बैठकांचे सत्र सुरु केले आहे. सानपाडा येथे आयोजित केलेल्या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, माजी उपमहापौर अविनाश लाड आणि माजी नगरसेवक संतोष शेट्टी आदी नेते मंडळी उपस्थित होती. बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर चर्चा झाली. येणारी निवडणूक मविआच्या नेतृत्त्वाखाली लढायची हे निश्चित झाले. कोणत्या जागेवर कोण लढेल, कुठून कोण उभा राहील याबाबत चर्चा करण्यात आली. जो उमेदवार सक्षम असेल, अशाच इच्छुकाला उमेदवारी देण्यात येईल. अर्थात स्थानिक नगरसेवकाला पहिले प्राधान्य दिले जाणार आहे अशी चर्चा बैठकी दरम्यान झाली. परंतु अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठीचा असणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai