महिला व विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 02, 2022
- 863
नवी मुंबई ः जन्म दाखला नसणे ते इंजिनियर होऊन एका महाविद्यालयात प्राध्यापक हा कचरावेचक महिलेच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रवास हे विकासाच्या दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल आहे. कचरावेचक महिलांच्या मुलांनी डम्पिंगवर न जाता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी स्त्री मुक्ती संघटनेने केलेल्या दोन दशकाच्या अथक प्रयत्नाचे हे फळ आहे असे उद्गार स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी काढले.
यावर्षी दहावीच्या परीक्षेत 25 विद्यार्थी व बारावीच्या परीक्षेला बसलेली 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात एका कचरावेचक भगिनीचाही समावेश आहे. बावीस वर्षाच्या गॅपनंतर घरी अभ्यास करून मंगला खरात परीक्षेला बसून पास झाली आहे. संगीता शेळके या कचरावेचक भगिनीची मुलगी भाग्यश्री शेळके ही दहावीत 90 टक्के मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाली आहे. या विद्यार्थासाठी दिप अर्चन धर्मादाय न्यासचे संदीप नेमलेकर व मिलिंद आचार्य यांनी व्यवसाय मार्गदर्शन सत्र घेतले. संदीप नेमलेकर हे चेतना महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी आपल्या सत्रात व्यवसायामध्ये असणारे विविध पर्याय सांगत हे व्यवसाय निवडून पुढे जाऊन काय संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती दिली. सतीश मोरे यांच्या एसपी मोरे कॉलेजच्या अनिल मखमले यांनीही एसपी मोरे कॉलेजमध्ये गरीब व गरजू मुलांसाठी सवलतीत उपलब्ध कोर्सेसची माहिती दिली. यावेळी गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.
स्वतःमधील कौशल्य वाढवा
- श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट च्या माध्यमातून परिसर भगिनींच्या मुलांसाठी 16 ऑगस्ट 2021 पासून मोफत संगणक वर्ग चालवले जातात तसेच परिसर भगिनींसाठी मोफत शिलाई मशीन वर्गही चालवला जातो. श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त श्री राधाकृष्णन व ललिता राधाकृष्णन व वृषाली मगदूम यांनी या विद्यार्थ्यांची संवाद साधला तसेच त्यांना प्रमाणपत्र वाटपही केले.
- विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री राधाकृष्णन व ललिता मॅडमनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा फायदा घेत स्वतःमधील कौशल्य वाढवत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या कोर्सचा उपयोग करून घेतला पाहिजे असे सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai