नगरसेवक गवतेंची घरवापसी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 19, 2022
- 646
शिवबंधन तोडून गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
नवी मुंबई : गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यात भाजपचे तीन नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत दाखल झाले होते. आता शिंदे यांनीच बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केल्याने या तिन्ही नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये घरवापसी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा वेगळा गट फोडल्यानंतर आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर आहे. मात्र नवी मुंबईतील शिंदे गटातील तीन नगरसेवकांनी पुन्हा भाजपात प्रवेश करुन शिंदेंना धक्का दिला आहे. गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भाजप नगरसेवकांनी प्रवेश केला होता. जवळपास भाजपचे 14 नगरसेवक आणि नगरसेविका पक्षाला रामराम ठोकून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. या भरतीत नवी मुंबईतील भाजपचे तीन नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे शिवसेनेत दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. पण, आता राज्यात पुन्हा शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केला आहे. आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai