साडेचार कोटींचा मुद्देमाल परत
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2022
- 672
परिमंडळ 2 मधील विविध गुन्ह्यांत ऐवज जप्त
नवीन पनवेल ः नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ दोनअंतर्गत 10 पोलिस ठाण्यांमध्ये 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये एकूण आठ कोटी 88 लाख 70 हजार 233 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यातील चार कोटी 49 लाख 72 हजार 264 किमतीचा मुद्देमाल न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादी व्यक्तींना हस्तांतरित करण्यात आला.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाअंतर्गत परिमंडळ दोनमधील मुद्देमाल हस्तांतरण आणि आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळा येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके येथे आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी (ता. 15) पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा पार पडला. पोलिस सहआयुक्त डॉ. जय जाधव आणि अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे विभाग महेश घुर्ये यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना आयुक्त बिपिन कुमार सिंह म्हणाले, की गुन्हे अन्वेषणातून हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, किमती वस्तू, मूल्यवान दागदागिने आहेत, परंतु यात काही दागिने असे असतात, की ज्यांचे नागरिकांसोबत अत्यंत संवेदनशील नाते निर्माण झालेले असते. काही दागिने वंशपरंपरागत पद्धतीने चालत येऊन आपल्यापाशी आलेले असतात. अशा वस्तूंची चोरी झाली की पूर्वजांची निशाणी हरवल्याचे दुःख हे चोरीपेक्षा कित्येक पटींनी अधिक असते. असे दागिने परत केल्यानंतर फिर्यादींच्या डोळ्यांमध्ये जे आनंदाश्रू तरळत आहेत, तेच आमच्या खात्याने घेतलेल्या परिश्रमाचे खरे फलित आहे असे मला वाटते.
- पनवेलच्या पोलिसांचा सत्कार
पनवेल शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक विजय कादबाने, निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक शिवाजी हुलगे यांचा जखमींना मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून आणल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. - ओएनजीसीकडून पोलिसांना बक्षीस
ओएनजीसी कंपनीतील चोरीप्रकरणी तापासात दाखवलेल्या कौशल्याबद्दल कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकार्यांनी नवी मुंबई पोलिस परिमंडळ 2 ला एक लाख रुपयांचे विशेष पारितोषिक घोषित केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai