ओबीसी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्र या
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 20, 2022
- 600
कृतज्ञता मेळाव्यात छगन भुजबळ यांचे आवाहन
नवी मुंबई ः ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी आमचा लढा सुरुच आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून विविध आयोग नेमण्यात आले. मात्र, प्रत्येक वेळी जातीय जनगणना न्यायालयीन लढाईत अडकली गेली. बहुजन समाज भारतात शक्तिशाली वर्ग असून तो 54 टक्के आहे. आपण राजकीय आरक्षण मिळवू शकलो, तरच आपले हक्क आणि अधिकार प्राप्त करु शकतो. त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात रहा; पण ओबीसी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्र या, असे आवाहन ओबीसी नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी वाशी येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हा आणि पनवेल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने 19 सप्टेंबर रोजी विष्णुदास भावे येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून छगन भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नाने शैक्षणिक, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात राज्यात सर्वप्रथम 27 टक्के आरक्षण लागू करुन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे शरद पवार हेच ओबीसींच्या न्याय-हक्कासाठी आम्हास साथ देणारे नेते आहेत. ओबीसींच्या एम्पीरिकला डेटा साठी देशभरातून मागणी होऊ लागली, त्यावेळी केंद्र सरकारने 2010 साली कृष्णमूर्ती आयोग नेमून काम सुरु केले. आमचे आघाडी चे सरकार असताना एम्पीरिकल डेटा गोळा करुन केंद्राकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यामध्ये त्रुटी काढून तो डेटा पुन्हा दुरुस्त करुन घ्या, असे केंद्राकडून सांगण्यात आले. आता केंद्रात आणि राज्यातही तुमचे सरकार आहे. त्यामुळे एकदाचे एम्पीरिकल डेटा पाठवून ओबीसींना सर्व प्रकारचे आरक्षण मिळू द्या, अशी विनंती छगन भुजबळ यांनी यावेळी भाजप सरकारला केली.
ओबीसींना 27 टक्के आरक्षण देऊन शरद पवार यांनी मुख्य प्रवाहात आणण्यास सुरुवात केली. ओबीसी समाज एकत्र आला तर देशाचे राजकारण आपल्या ताब्यात घेईल म्हणून जाणून-बुजून मंडल-कमंडल असा वाद करत ओबीसी समाजाला वंचित ठेवले गेल्याचा आरोप माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार शशिकांत शिंदे यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन केले. मेळाव्यास नवी मुंबई आणि पनवेल मधील विविध ओबीसी जाती समुह मोठ्या संख्येने उपस्थित होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai