31 ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येणार हरकती
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2022
- 548
नवी मुंबई ः शहराचा प्रारूप विकास आरखडा जनतेकडून सूचना व हरकती मागविणेसाठी प्रसिद्ध 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. यासंबधी हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप विकास आराखड्यात अनेक त्रुटी असून तो जनतेला समजण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती. तसेच आराखड्यातील आरक्षणावरुन अनेक आक्षेप घेण्यात आले असून त्यासंबधीच्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्यानुसार पालिकेने 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. काही हरकती/सूचना असल्यास आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे त्या लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तसेच पालिका मुख्यालय, मुख्य टपाल कक्ष तसेच सहायक संचालक, नगररचना यांचे कार्यालय व सर्व विभाग कार्यालये येथे अर्ज स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai