महापालिका आयुक्तांची कर्मचार्यांना दिवाळी भेट
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 21, 2022
- 624
22 कर्मचार्यांना पदोन्नती तर 63 कर्मचार्यांना प्रगती योजना लागू
नवी मुंबई ः पदोन्नती समितीने शिफारस केल्यानुसार महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी 22 कर्मचार्यांना पदोन्नती दिली आहे. तर 63 कर्मचार्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करुन त्यांना दिवाळी भेट दिली आहे. पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हे दोन्ही प्रश्न आयुक्तांनी मार्गी लावल्याने कर्मचारीवृंदामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मागील बर्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदोन्नत्या तसेच आश्वासित प्रगती योजना यांचे लाभ लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पदोन्नती समितीच्या कामाला विशेष गती देण्यात आलेली आहे. आयुक्तांनी पदभार स्विकारल्यानंतर इतर कामकाजाप्रमाणेच अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबतही बारकाईने लक्ष देत पदोन्नती समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये पदोन्नती समितीने शिफारस केल्यानुसार आयुक्त नार्वेकर यांनी वरिष्ठ लिपिक (लेखा) या पदावरून 18 कर्मचार्यांना उप लेखापाल / लेखा परीक्षक तसेच 4 उप स्वच्छता निरीक्षकांना स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती दिली आहे. त्याचप्रमाणे 1 शाखा अभियंता, 10 जोडारी, 8 प्लंबर, 15 मदतनीस, 5 मीटर वाचक, 7 वायरमन, 7 माळी / बहुउद्देशीय सेवक व 10 शस्त्रक्रियागृह सहाय्यक अशा एकूण 63 अधिकारी, कर्मचारी यांना 3 लाभांचा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यामध्ये विशेषत्वाने चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचा विचार करण्यात आलेला आहे.
मागील दीड वर्षात 35 संवर्गात 315 अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नत्या झालेल्या आहेत. यामध्ये वरिष्ठ पदांपासून वर्ग 4 च्या पदांपर्यंत सर्व संवर्गांना न्याय मिळेल याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. याशिवाय 50 संवर्गातील 583 अधिकारी, कर्मचारी यांना 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai