घणसोली अनधिकृत बांधकामांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 02, 2022
- 584
नवी मुंबई ः पालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील ओमशंकर अपार्टमेंटच्यासमोर, रस्त्यालगत, अर्जूनवाडी, येथे व गौरी अपार्टमेंटच्या पाठीमागे आरसीसी फुटींगचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदर अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभाग घणसोली विभाग यांचेकडून तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम पुर्णत: निष्कासित करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai