खाडीकिनार्यालगत 354 झोपड्या जमीनदोस्त
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 24, 2022
- 615
वन विभाग, पोलीस प्रशासन व पालिकेचा संयुक्त कारवाई
नवी मुंबई ः वाशी गांव सेक्टर 31 येथे खाडीकिनारी राखीव कांदळवनाच्या जागेत खारफुटीचीची कत्तल करून तसेच तसेच वनविभाग व पालिकेच्या जागेत अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. वन विभाग, पोलीस प्रशासन व पालिकेमार्फत संयुक्त कारवाई करुन सूमारे 354 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.
नवी मुंबई शहराला विस्तीर्ण असा खाडी किनारा लाभला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवन खारफुटी आहे. मात्र काही भूमाफियांकडून खारफुटीवर राडारोडा टाकून सर्रास कत्तल केली जात आहे. तसेच डेब्रिजचा भराव टाकून झोपड्या उभारल्या जात आहे. या झोपड्या भाड्यावर दिल्या जात आहेत. वाशी गांव सेक्टर-31 येथील कांदळवन व खारपुटी नष्ट करुन तेथे बेकायदेशीर झोपडपट्ट्या वसलेल्या होत्या. केरळ भवन ते वाशी हायवेपर्यंत उद्यानाकरिता आरक्षित असलेल्या मोकळ्या भूखंडावर तसेच वाशीगांव खाडीकिनार्यालगत उभारण्यात आलेल्या या झोपडयांवर वन विभाग, पोलीस प्रशासन व पालिकेमार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेत 354 इतक्या मोठ्या संख्येने अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. या तोडक मोहिमेसाठी वन विभागाचे अधिकारी, वन विभागाचे सुरक्षा रक्षक, तसेच तुर्भे / वाशी / सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक, वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, सुरक्षा रक्षक, 16 मजूर यांनी 8 जेसीबी आणि इतर उपकरणांच्या सहाय्याने झोपड्या निष्कासनाची मोहिम पार पाडली.
- 10 जणांविरोधात गुन्हा
खारफुटी नष्ट करुन तेथे काही स्थानिकांकडून विना परवाना मत्स, खेकडा पालन केले जात आहे. वाशी गाव खाडीत सर्व्हे क्रमांक 17 वर अशाच प्रकारे खारफुटीची कत्तल करून झोपड्यांचे साम्राज्य उभे केले होते. याबाबत वन विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीनुसार राखीव कांदळवन क्षेत्रात वृक्षांची मोठया प्रमाणात कत्तल करून तेथे डेब्रीजचा भराव टाकून, झोपडया उभारून त्यामध्ये राहणार्या झोपडीधारकांकडून अवैधरित्या पैसे वसूल करणे, कांदळवनात राडारोडा टाकून कांदळवनाची कत्तल करणे, विनापरवाना खेकडा व मासेमारी करणे या प्रकरणी वन विभागामार्फत 10 जणांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai