मोरबेत सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 12, 2022
- 578
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आयुक्तांचे आवाहन
नवी मुंबई ः महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मोरबे धरण प्रकल्पाची व परिसराची पाहणी केली तसेच भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रालाही भेट देऊन त्याठिकाणच्या यंत्रणेची पाहणी केली. यावर्षी पर्जन्यवृष्टी काहीशी कमी झाल्याने धरण पूर्ण पातळीइतके भरलेले नाही. धरण क्षेत्रात सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय न करता गरजेपुरताच पाण्याचा वापर करावा असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
मोरबे धरण प्रकल्पाची पाहणी करताना आयुक्तांनी धरण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरील व्यक्तींना सुयोग्य परवानगी शिवाय मज्जाव करावा असे निर्देशित करताना परिसरातील वृक्षलागवड व संवर्धनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे अशा सूचना केल्या. धरण प्रकल्पग्रस्तांची 7 गावे व 8 वाड्या यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिकेची असून त्याकडेही विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. धरण क्षेत्रात अतिक्रमण होऊ नये याची काळजी घ्यावी तसेच धरण परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. धरण पाणलोट क्षेत्रात आगामी उन्हाळी कालावधीत वाळू उपसा होणार नाही याकडेही बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन त्याठिकाणच्या यंत्रसामुग्रीची पाहणी करीत नार्वेकर यांनी जलशुध्दीकरणाची कार्यपध्दती जाणून घेतली तसेच जलवितरणाच्या पध्दतीची माहिती घेतली. जलशुध्दीकरणाच्या बांधकामाचे आयुर्मान वाढविण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या करून घेण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देशित करतानाच तेथील विद्युत वापरावर नियंत्रण आणणे व अपारंपारिक ऊर्जेला प्राधान्य देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. जलवितरण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारी अत्याधुनिक स्काडा प्रणाली काळानुरूप अद्ययावत असणे गरजेचे असून त्यादृष्टीने आवश्यक बदल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करावी व जलवितरण पध्दती अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने कार्यप्रणाली अंमलात आणावी असे त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai