‘अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूट' ची स्थापना
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 13, 2023
- 667
नवी मुंबई : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने अनुवांशिक विकार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी अपोलो जेनोमिक्स इंस्टीट्यूट्सची स्थापना केली आहे. जेनोमिक अनुवांशिक विकारांशी संबंधित आहे तसेच यामुळे दुर्मिळ आणि अनुवांशिक रोगांचे निदान आणि उपचार करण्यात मदत होणार आहे.
एखाद्या व्यक्तीला रोग होण्याच्या जोखमीबद्दल आणि विशिष्ट उपचारांना त्यांच्या प्रतिसादाबद्दल माहिती देखील प्रदान केली जाऊ शकते आणि म्हणून अचूक व वैयक्तिकृत औषधोपचार करता येतात. अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूटमुळे व्यक्तीला, जोडप्यांना आणि कुटुंबीयांना जनुकीय विकारांचे वैद्यकीय, मानसिक, कौटुंबिक आणि पुनरुत्पादक परिणाम समजून घेण्यास मदत होईल. अपोलो जेनोमिक्स इन्स्टिट्यूटमधून मोठ्या लोकसंख्येला अनुवांशिक विकार, असामान्य अनुवांशिक चाचण्या, उशीरा वाढणारी मुले, जन्मजात विसंगती याबाबत आणि अनुवांशिक अस्वस्थता असलेल्या कुटुंबातील सदस्यांना देखील लक्षणीयरित्या फायदा होईल.
आनुवांशिक विकारांवरती योग्य वेळी उपचार करून घेण्याचे आवाहन बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अपोलो हॉस्पिटलच्या पत्रकार परिषदेमध्ये केले. दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शर्मिला टागोर यांनी पत्रकारांशी आणि अपोलो हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टर यांच्या सोबत संवाद साधला. या अपोलो जीनोमिक्स या इन्स्टिट्यूट चे उद्घाटन शर्मिला टागोर यांच्या हस्ते झाले. भारतातील रूग्णांच्या फायद्यासाठी नवीनतम वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा सुरु केल्याबद्दल टागोर यांनी हॉस्पिटल्सचे अभिनंदन केले. संगिता रेड्डी, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाल्या, “संशोधनात असे आढळून आले आहे की जवळ-जवळ प्रत्येक रोगाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मूळ हे अनुवांशिक असू शकते. यामुळे जेनोमिक औषध दैनंदिन वैद्यकीय सेवांसाठी उपलब्ध होईल आणि अनुवांशिक अस्वस्थता असलेल्या रुग्णांना आणि कुटुंबांना मदत मिळेल. जेनोमिक्स केंद्र रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निदान, रोगमुक्तता, समुपदेशन आणि बहु-वैशिष्ट्ये असलेली सेवा यासह सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करेल.” अपोलो हॉस्पिटल्सचे ग्रूप वैद्यकीय संचालक प्रा. (डॉ.) अनुपम सिबल म्हणाले, “जेनोमिक औषधांमुळे एखाद्या व्यक्तीच्या अनुवांशिक संरचनेचे मूल्यांकन करून रोगावरील उपचार आणि त्यावरील प्रतिबंध यावर लक्ष केंद्रित करता येते. जोखीम असलेल्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी केली जाईल.”
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai