नवी मुंबई पोलीसांचे प्रगतीपुस्तक सादर
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 10, 2023
- 709
गुन्हे उकलीचे प्रमाण घटले ; गुन्हेगारीच्या प्रमाणात घट
नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आपल्या कामकाजाचे वार्षिक प्रगतीपुस्तक सादर केले आहे. 2022 सालात नवी मुंबईत घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण जरी घटले असले तरी गुन्हे उकल करण्यात नवी मुंबई पोलीसांची कार्यक्षमताही घटल्याचे त्यांच्या प्रगतीपुस्तकावरुन दिसते. त्याचबरोबर वाहतुक पोलीसांची 44 कोटींची दंडवसुली बाकी असल्याने याही वसूलीचे प्रमाण कमी असल्याचे जाणवते. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून सदर माहिती दिली.
दरवर्षीप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेवून नवी मुंबई पोलीसांनी सन 2021-22 या काळात केलेल्या कामकाजाचा तपशील सादर केला. 2022 साली पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी निदर्शनासआणून दिले. गेल्यावर्षी विविध प्रकरणात 6642 गुन्हे नोंदवण्यात आले हेोते पण चालु वर्षी हे प्रमाण 6443 पर्यंत मर्यादीत राहीले. यावर्षी वाहन चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, विनयभंग व बलात्कार या गुन्ह्यात वाढ झाल्याचे त्यांनी प्रगतीपुस्तकात नमुद केले आहे. त्यापैकी बलात्कार प्रकरणात 100 टक्के गुन्हे उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहनचोरी याप्रकरणातील गुन्हे उकल मागील वर्षाच्या प्रमाणात कमी आहे. नियमांचे उल्लंघन केले म्हणून वाहतुक पोलीसांनी 6 लाख 83 हजार 390 चलने फाडली असून त्यापैकी 1 लाख 62 हजार 512 चलनांचे 15.25 कोटी रुपये वसूली झाली आहे. त्याचबरोबर 44.70 कोटी रुपये वसुली होणे बाकी असल्याचे अहवालात नमुद केले आहे. नवी मुंबईत 2021-22 या काळात 734 अपघात घडले असून 298 लोक मृत्युमुखी पडले आहेत. यावेळी नवी मुंबई पोलीसांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत बार-पब, हुक्कापार्लर व जुगार अड्ड्यांवर अधिक धाडी टाकून 1255 जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर अमंलीपदार्थ विभागाने यावेळी 149 गुन्हे नोंदवले आहेत जे मागच्या वर्षाच्या प्रमाणात दुप्पट आहे.
2021-22 या काळात 11 अधिकारी व पोलीसांचा पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला आहे. दोन पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक देवून गौरवण्यात आले आहे तर दोन पोलीसांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलीस कल्याणसाठी 27.68 लाख रुपये खर्च केले आहेत. यावेळी 219 पोलीसांची भरती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झाल्याचे सांगितले. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीसांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai