लोकअदालतीत 241 वीजप्रकरणे निकाली
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 21, 2023
- 541
53 लाख 55 हजाराचा महसूल प्राप्त
नवी मुंबई ः तालुका स्तरावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी 241 प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत सबंधित ग्राहकांना 53 लाख 55 हजार 781 रुपयांचा भरणा केला.
भांडूप परिमंडलातील ठाणे व पेण मंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या तसेच वीजचोरीची दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणे सामजस्याने सोडविण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार 241 प्रकरणामध्ये तडजोड होऊ शकली व 53 लाख 55 हजार 781 रुपयांची वसुली झाली. भांडूप परिमंडला अंतर्गत ठाणे मंडलातील ठाणे विभाग-1, ठाणे विभाग-2, वागले इस्टेट विभाग, भांडूप विभाग व मुलुंड विभागात 128 ग्राहकांनी 28 लाख 24 हजार 781 रुपयांचा भरणा करून प्रकरणांचा निपटारा केला. तर वाशी मंडळातील वाशी विभाग, नेरूळ विभाग व पनवेल शहर विभागातील 49 ग्राहकांनी 13 लाख 21 हजार रुपयांचा भरणा केला. पेण मंडलात 64 ग्राहकांनी 12 लाख 80 हजार रुपयांचा भरणा करण्यात आले.
लोकअदालत ग्राहकांच्या वीज बिलाबाबत काही तक्रारी असल्यास सोडविण्यासाठी घेतली जाते. सदर लोकअदालत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता, अरविंद बुलबुले, व इब्राहीम मुलाणी तसेच कार्यकारी अभियंते सुनील माने, देवेंद्र उंबरकर, सुरेश सवाईराम, दतात्रय भणगे, जीवन चव्हाण, नितीन थिटे, अनिलकुमार पाटील, गणेश पाचपोहे व शिवाजी वायफळकर यांनी विशेष मेहनत घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai