अंमलीपदार्थ विक्री प्रकरणी चारजणांना अटक
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 21, 2023
- 561
नवी मुंबई : गत आठवड्यात तळोजामधून अमंलीपदार्थ विक्रि करण्यास आलेल्या दोना नायझेरीयन नागरिकांना अटक केली होती. आता एपीएमसी पोलिसांना अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून 30 लाखांचे मेथाक्युलोन हा अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अलाउद्दीन मोहमद फजुरुददीन मौलाना, अब्दुल कलाम मोहमंद उबोलोन, मोहम्मद मुकिम यासीन सिद्धिकी, फैयाज साफिक अहमद, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ए.पी.एम.सी परिसरात काही व्यक्ती मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ए.पी.एम.सी पोलीस ठाण्याकडील पथकाने वारणा सर्कल, मॅफको मार्केट, सेक्टर 18, वाशी, नवी मुंबई परिसरात सापळा लावला. त्यांना एका होंडा सिटी यामधून 4 संशयित इसम मिळून आले, त्यांना ताब्यात घेतले. त्यांची व त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 250 ग्रॅम मेथाक्युलोन हा विदेशी अमली पदार्थ आढळून आला. त्याचे बाजारमूल्य अंदाजे 30 लाख रुपये एवढे आहे.
हा अंमली पदार्थ वसई परिसरात विक्री करण्यास आणण्यात आला होता. या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 30 लाख रुपयांचा अमलीपदार्थ आणि 2 लाख रुपयांची गाडी असा 32 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींना 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai