नैसर्गिक रंगांनी रंगली बाजारपेठ
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2023
- 554
नवी मुंबई : वाशीतील घाऊक बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग,कलर ब्लास्टर, सिलेंडर स्प्रे रंग, लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकऱ्या विक्रिस दाखल झाल्या आहेत.
होळी व धुलीवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीकरिता ग्राहकांची लगबग सुरु झाली आहे. वाशीतील घाऊक बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकऱ्यांनी बाजारपेठ फुलली आहे. येथील बाजारपेठत नवी मुंबईसह मुंबई उपनगरातील ग्राहक स्वतःत घाऊक दरात वस्तू मिळत असल्याने जादा ग्राहक खरेदीला येत असतात. बाजारात भारतीय बनावटी साहित्य उपलब्ध असून मागील वर्षी पेक्षा यंदा दर 15%-20%कमी असल्याचे मत व्यापारी यांनी व्यक्त केली आहे. नैसर्गिक रंगाला अधिक मागणी करण्यात येत आहे. नैसर्गिक रंग 20 रु ते 250 रु तर ओले रंग 150-200 रुपयांवर उपलब्ध आहेत. तसेच यंदा बाजारात कलर ब्लास्टर, सिलेंडर स्प्रे रंग ही उपलब्ध असून 900, 1250 ते 1700रुपयांनी उपलब्ध आहे.
बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्याची क्रेज लहान मुलांमध्ये असते. पबजी या खेळाची पिचकारी उपलब्ध असून लहानग्यांमध्ये याची अधिक क्रेज पहावयास मिळत आहेत. यंदा आवाज येणार पिचकारी 250 रुपयांनी उपलब्ध आहे. विविध डिझाईनच्या पिचकारी 40 रु ते 650 रुपयांवर तर पबजी पिचकारी 250 रु ते 500रुपयांवर उपलब्ध आहेत. होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला ग्राहकांनची लगबग सुरू असून ग्राहक नैसर्गिक रंगाला अधिक पसंती देत आहेत. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये कार्टून पिचकारीची मागणी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai