विकास आराखड्याच्या सुनावणीचा श्रीगणेशा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2023
- 491
नवी मुंबई ः महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावरील जनतेच्या सूचना व हरकतींच्या सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 14 मार्चपासून या सुनावण्या विभागनीय होणार असून त्याबाबतच्या नोटीसा संबंधितांना बजावण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रारुप विकास आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 26 (1) अन्वये नागरिकांकडून सूचना, हरकती मागविणेसाठी 10 ऑगस्ट 2022 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या सूचना व हरकती धारकांना प्रत्यक्ष सुनावणी देणेसाठी नवी मुंबई पालिकेने नियोजन समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये राज्याचे नगररचना विभागाचे माजी संचालक सुधाकर नानगुरे, माजी सहसंचालक विकास भुक्ते, पर्यावरण तज्ज्ञ नीता पाकधने व व्हिजेटीआयचे संरचना अभियंता डॉ. सांगळे यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीची प्राथमिक बैठक 14 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सूचना / हरकत धारकांची सुनावणी घेण्याकरिता वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. सदर सुनावणी पालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, येथे घेण्यात येणार आहे.
पालिकेच्या प्रारुप विकास आराखड्यावर सुमारे 12 हजार सुचना व हरकतींचा पाऊस नवी मुंबईकरांनी पाडला होता. ज्या नागरिकांनी विशेष सुचना व हरकत दाखल केली आहे त्यांची सुनावणी 28 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. प्रारुप विकास आराखड्यावर सिडकोने यापुर्वी घेतलेले आक्षेप सर्वश्रुत असून त्यास नवी मुंबई महानगरपालिका कसा प्रतिसाद देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- सिडकोच्या हरकतींवर लक्ष
नवी मुंबई महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखड्यात 525 भूखंडांवर आरक्षण टाकले होते. शासनाने त्यापैकी काही भूखंडावरील आरक्षण काढण्यास महापालिकेला सांगितले होते. पालिकेच्या विकास आराखड्यावर सिडको कोणत्या हरकती नोंदविते याकडे महापालिकासह नवी मुंबईतील राजकर्त्यांचे लक्ष लागले आहे. महापालिकेने सिडकोच्या हरकतींची दखल न घेतल्यास पुन्हा एकदा सिडको विरूध्द महापालिका असा संघर्ष पहायला मिळेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai