सिडकोत बोगस कर्मचाऱ्यांना वेतन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 14, 2023
- 301
नवी मुंबई : सिडकोच्या आस्थापनेवर कुठल्याही पदावर नियुक्ती झालेली नसताना तब्बल 29 कर्मचाऱ्यांची समन्वयक व सल्लागार पदावर नियुक्ती झाल्याचे दाखवून सिडकोची तीन कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडकोतील काही अधिकाऱ्यांनीच संगनमत करून हा प्रकार केला असल्याची बाब समोर आली आहे.
सिडकोच्या आस्थापनेवर कार्यरत नसतानाही 2017 पासून सिडको महामंडळातून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये वेतन निघत असल्याची बाब समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सिडकोचे साधारण तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा सर्व प्रकार चेतन बावत नामक व्यक्तीने सिडको कार्यालयाच्या लेखा विभागात जाऊन सिडकोत कामाला नसतानाही मोठ्या प्रमाणात बँकेत वेतन जमा होत असल्याच्या केलेल्या तक्रारीनंतर उघड झाला आहे. यातील प्रमुख आरोपी म्हणून सागर तपाडिया याचे नाव समोर आले आहे. त्याने गुन्हा कबूल केल्याने त्याच्या विरोधात सिडकोचे कार्मिक विभागाचे प्रमुख फैय्याज खान यांनी बुधवारी संध्याकाळी सीबीडी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केल्याची माहिती सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी दिली.
29 बोगस कर्मचारी
- 2017 मध्ये सहा बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे एकूण सुमारे 19 लाख रुपये
- 2021 साली 10 बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे सुमारे 21 लाख रुपये.
- 2022 साली 24 बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे सुमारे 1.69 कोटी रुपये.
- 2023 - 19 बोगस कर्मचारी, वेतन 72.62 लाख रु.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai