उड्डाणपुलावर हाईटगेज पुनर्जिवीत करा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2023
- 415
उरण ः उरणमधील वाढते अपघात व अपघातात मृत्युमुखी पडलेले नागरिकांची संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून नवघरपासून ते फुंडे हायस्कूल दरम्यान जो उडाणपूल आहे त्या ठिकाणी हाईटगेज पुनर्जिवीत करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी सिडको, पोलीस व वाहतुक विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.
उरण तालुक्यातील नवघर ते फुंडे हायस्कूल दरम्यान जो उड्डाणपूल मार्ग आहे त्या मार्गावरून अनेक अवजड वाहनांची बेकायदेशीर व अनधिकृत वाहतूक सेवा सुरु आहे. त्यामुळे अवजड ट्रेलर, डम्पर तसेच इतर अति अवजड वाहनांची वर्दळ होते. बाजूला फुंडे हायस्कूल व सिनीयर कॉलेज तसेच भागुबाई इंग्लिश मेडियम स्कूल, जेएनपीटी टाऊनशीप मधील शाळा असल्यामुळे व नवघर, कुंडेगाव पागोटे, जेएनपीटी टाऊनशीप, भेंडखळ या गावांना पनवेल उरण जाण्यासाठी सिडकोकडून पर्यायी रस्ता म्हणून त्या ब्रीजचे काम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी हाईटगेज बसविण्यात आले होते. कालांतराने ते अपघातात तुटून गेले आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हाईटगेज त्वरित बसवून घेऊन अति अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिकांचा उद्रेक होऊन रस्ता बंद आंदोलन पुकारावे लागेल व त्याठिकाणी उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास सिडको प्रशासन, ट्रॅफिक प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल. म्हणून तातडीने या बाबीचे गांभीर्य ओळखून सिडको प्रशासन व ट्रॅफिक प्रशासनाने आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक, आमदार महेश बालदी, कार्यकारी अभियंता द्रोणागिरी-2 सिडको कार्यालय बोकडविरा, वरिष्ठ पोलिस निरिक्षक उरण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (ट्रैफिक), सहाय्यक पोलिस कमिशनर झोन-2 आदी ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai