तहसिलदार विजय तळेकर यांची बदली
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 05, 2023
- 810
नवीन पनवेल ः पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे पुरवठा विभागात तहसीलदार असलेले विजय पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. याच अनुषंगाने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तळेकर यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला.
शासनाच्या विविध योजना राबवून त्या समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम तहसीलदार विजय तळेकर यांनी परिणामकारक केले आहे. संजय गांधी निराधार योजना, महिला, अनाथ मुले, अपंगांतील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, कृष्ठरोग यांसारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी या सर्वांना या योजनेतून लाभ मिळवून दिला होता. या योजनेखाली पात्र होणाऱ्या कुटुंबात एक लाभार्थी प्रतिमाह आर्थिक साह्य देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. युद्धपातळीवर काम करून दिवसात हजार दाखले वाटपाचे कामही त्यांनी केले होते. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर केलेले प्रयत्न, तसेच रेती माफियांविरोधात केलेल्या कारवाईमुळे तळेकर अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai