प्रभाग समितीवर भाजपचे वर्चस्व
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 33
प्रभाग समिती क व ब ची सभापती निवड बिनविरोध
पनवेल ः महापालिकेच्या प्रभाग अ,ब क,ड साठी प्रभाग समिती सभापती निवडणूक दि. 11 ऑगस्ट रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, येथे घेण्यात आली. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे होते. पीठासीन अधिकाऱ्यांसह पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामनिर्देशित सदस्यांमधून नियमानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.या चारही प्रभाग समित्यांवर भाजपचे सभापती विराजमान झाले आहेत. दोन ठिकाणी निवडणुक बिनविरोध झाली.
दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांचेकडे प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. प्रभाग समिती अ खारघर मध्ये महापालिका सदस्य रविंद्र भगत व महापालिका सदस्य योगिता फडके यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केले होते. यावेळी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये महापालिका सदस्य रविंद्र भगत यांना 13 मते मिळाली व योगिता फडके यांना 4 मते मिळाली. प्रभाग अ मधून रविंद्र भगत यांना विजयी घोषित करण्यात आले. प्रभाग समिती ब मध्ये महापालिका सदस्य मधू पाटील व प्रभाग क मधून महापालिका सदस्य रविंद्र जोशी यांचा सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने या ठिकाणी बिनविरोध निवड झाली. तसेच प्रभाग समिती ड मध्ये महापालिका सदस्य अजय बहिरा व महापालिका सदस्य मनिषा म्हात्रे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. यावेळी झालेल्या मतदान प्रकियेत सदस्य अजय बहिरा यांना 19 मते पडली व सदस्य मनिषा म्हात्रे यांना 3 मते मिळाली. प्रभाग समिती ड मधून महापालिका सदस्य अजय बहिरा यांना विजयी घोषित करण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ,ब,क,ड सभापती पदी 11 ऑगस्ट, 2026 पासून प्रभाग समितींच्या लगतनंतरच्या सरकारी वर्षातील पहिल्या सभेपर्यंतच्या कालावधीसाठी नवनिर्वाचित चारही प्रभाग समिती सभापतीची निवड झाल्याचे घोषित केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai