महसूल सप्ताहाला कोकण विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 08, 2023
- 672
नवी मुंबई : कोकण विभागात विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वात या सप्ताह दरम्यान संपूर्ण कोकण विभागात विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोकण महसूल विभागात या सप्ताहात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.
राज्यात सर्वत्र दि.01 ऑगस्ट 2023 ते 07 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कोकण विभागातही विविध कार्यक्रम पार पडले. “जन संवाद” या कार्यक्रमामध्ये शासकीय जमिनीचे भाडेपट्टयांचे नुतनीकरण, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद, संजय गांधी निराधर योजनेअतंर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण. ई पीक पाहणी, सलोखा योजना राबविणे, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच महसूल आदालतींचे नियेाजन करण्यात आले. ‘एक गांव एक सलोखा' योजना राबविण्यात आली. “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे पाल्यांना विविध प्रकरणांचे दाखले देण्यात आले. अनुकंपातत्वावर कर्मचारी यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. तर महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताह दरम्यान कर्मंचाऱ्यांची सेवापुस्तके अद्यावत करण्यात आली. कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रकरणे अंतिम करण्यात आली. “लक्ष्मी योजने” अंतर्गत सातही जिल्हयात लाभार्थ्यांना 7/12 वितरण करण्यात आले.
महसूल सप्ताहाच्या सांगता समारोपाच्या दिवशी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनातून 7 व 8 ऑगस्ट या दोन दिवशी कोकण भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूल सप्ताहनिमित्त महसूल सप्ताहाची थोडक्यात माहिती असलेला सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. कोकण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सेल्फी पॉईंटमध्ये सेल्फी काढले. या आरोग्य शिबीरास महसूल विभागातील उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त गिरिष भालेराव, नायब तहसिलदार माधुरी डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कोकण भवनातील महसूल विभागाचे अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला. महसूल सप्ताहानिमित्त कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कोकण भवनातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोकण भवनाच्या आवारात आरोग्य तपासणी शिबीराच्या निमित्ताने महसूल सप्ताहाची सांगता झाली.
- अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरव
महसूल सप्ताह दरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात उपजिल्हाधिकारी शितल देशमुख, नायबतहसिलदार श्रीकांत कवळे, लघुलेखक सुनिल वाघ, वाहनचालक सतिश देसाई, शिपाई संजय मोरे, हमाल प्रदिप भोसले, सेवानिवृत्त नायब तहसिलदार एकनाथ नाईक या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राधाकृष्ण विखे पाटील, महसूल, पशू संवर्धन व दुग्ध विकास यांच्या हस्ते महसूल दिन गौरव-2023 प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, अपर आयुक्त कोकण विभाग विवेक गायकवाड, उप आयुक्त महसूल कोकण विभाग व अधिकारी आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai