महामानवाला विनम्र अभिवादन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 08, 2018
- 698
नवी मुंबई ः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात अॅम्फीथिएटर येथे प्रतिमापूजन संपन्न झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी नवी मुंबईतून पुढे जाणार्या नागरिकांकरीता पालिकेच्या वतीने सी.बी.डी. बेलापूर येथील उड्डाणपुलाखाली सायन पनवेल महामार्गावर सुविधा कक्ष उभारून त्याठिकाणी चहापान व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणीही महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे, उपआयुक्त अमोल यादव व दादासाहेब चाबुकस्वार, सहा. आयुक्त चंद्रकांत तायडे, बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. अशाच प्रकारची व्यवस्था सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ठिकाणीही करण्यात आली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai