ऐरोलीतील डॉ. आंबेडकर भवनाला गळतीचे ग्रहण
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 02, 2023
- 578
कोट्यावधींचा जलरोधकाचा खर्च गेला वाया
नवी मुंबई ः आंबेडकर भवनाला लागलेल्या खर्चाच्या गळतीचे ग्रहण सुटता सुटेनाचा अनुभव नवी मुंबईकर आणि आंबेडकरी जनता घेत आहे. 13 कोटींच्या वास्तुला 17 कोटींचे मार्बल त्यावर 15 कोटींचे सुशोभिकरण आणि 2 कोटींचा जलरोधकाचा खर्च करुनही पालिकेच्या तिजोरीला लागलेली गळती कायम आहे. याही पावसाळ्यात पुन्हा एकदा आंबेडकर भवनात गळती लागल्याने जलरोधकाचा खर्च वाया गेल्याची चर्चा नवी मुंबईत आहे.
आंबेडकर भवनाची निर्मिती आणि त्यावरील खर्च हा सध्या नवी मुंबईतील चर्चेचा विषय आहे. 13 कोटी खर्चुन उभारण्यात आलेल्या आंबेडकर भवनाला 17 कोटींचे मार्बल लावण्याचा अट्टाहास त्यावेळचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी धरला होता. त्याला आयआयटी मुंबई, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विरोध करुनही आंबेडकरी जनतेच्या भावनेचा आदर राखत मार्बल लावण्याचा निर्णय रेटुन नेण्यात आला. परंतु, लावलेल्या मार्बलने सदर भवनाच्या सौंर्द्यात भर न घालता अजूनच विद्रुप केल्याचे अनेक वास्तुविशारदांचे म्हणणे आहे. परंतु, ज्या राजकर्त्यांनी हा राजहट्ट तडीस नेला ते मात्र कामाच्या दर्जाबाबत मुग गिळुन गप्प आहेत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
आंबेडकर भवनात वारंवार गळती होत असल्याने तेथे 2 कोटी रुपये खर्च करुन जलरोधकाचे काम करण्यात आले. हाही खर्च वाया गेल्याचे दिसत आहे. याही पावसात अनेक ठिकाणी गळती लागल्याने पुन्हा एकदा एसी शिट्स लावण्याचे काम शहर अभियंता विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन आंबेडकर भवनाचे सुशोभिकरण करण्यात आले. या कामाचा दर्जा अतिशय सुमार असून ठिकठिकाणी झालेल्या पडझडीतून ते चित्रांकित होत आहे. त्यामुळे काही नेत्यांच्या राजकीय भावनेपोटी केलेला कोट्यावधींचा खर्च वाया गेल्याने आंबेडकर भवनाला लागलेले गळतीचे ग्रहण कधी थांबेल या विवंचनेत नवी मुंबईकर आहेत.
- आंबेडकर भवनाची मालकी कोणाची ?
सध्या आंबेडकर भवनाचा ताबा काही ठराविक राजकीय नेत्यांकडे असल्याचे चित्र त्यांच्या तेथील वास्तव्यावरुन दिसत आहे. भवनातील प्रशासकीय कार्यालयाचा ताबा या राजकीय मंडळींकडे असून तेथून ते आपला राजकीय कारभार हाकत असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. पालिकेचे अधिकारी या नेत्यांच्या दबावामुळे हतबल असल्याने या भवनाची मालकी कोणाची असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांनाच पडला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai