ठोक मानधनावरील शिक्षकांचे उपोषण
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 05, 2023
- 400
नवी मुंबई : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिकेच्या ठोक मानधन शिक्षकांनी वेतन वाढीसाठी एल्गार पुकारला आहे. प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्या शिक्षकांनी केला आहे.
नवी मुंबई महापालिकेमध्ये प्राथमिक ठोक मानधन शिक्षक, माध्यमिक ठोक मानधन शिक्षक, बालवाडी शिक्षिका व मदतनीस असे एकूण 450 शिक्षक काम करत आहेत. सात वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची वेतनवाढ दिली गेलेली नाही. पालिकेने नवीन सुरू केलेल्या सीबीएससी शाळा किंवा इंग्लिश मीडियमच्या शाळेतील शिक्षकांना अनुक्रमे 35, 27 हजार वेतन दिले जात आहे, तसेच बारा वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगारात काम करावे लागत असल्याने शिक्षकांकडून वेतन वाढीसाठी सोमवारपासून (ता.4) महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावेळी ठोक मानधनावर ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना 2017 नंतर वेतनवाढ होणे अपेक्षित असताना मागील सहा वर्षांपासून पालिकेने कोणतीही वेतनवाढ केली नसल्याने प्रशासनाचा निषेध केला गेला.
- प्रमुख मागण्या
सहा वर्षांपासून वेतनवाढ फरकासहीत द्यावी. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीचा विचार करून ‘पवित्र' पोर्टलला नवी मुंबई पालिकेतील आमच्या जागा वगळून भरती करणे. महापालिकेत काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस यांना कायम करणे. महापालिकेत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कायम करून भविष्याची हमी देणे. जोपर्यंत कायमचा प्रस्ताव मंजूर होत नाही; तोपर्यंत एक दिवसाचा ब्रेक देऊन सलग नियुक्ती देण्याचे आदेश मिळावेत. माध्यमिक शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मंजूर पदावर सामावून घेणे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai