कोकण विभागात 54 कौशल्य विकास केंद्र कार्यान्वीत
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 19, 2023
- 234
नवी मुंबई : तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृक श्राव्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ झाला. राज्यातील 511 ग्रामपंचायतीमधील ही केंद्रे एकाच वेळी सुरू करण्यात आली असून, त्यापैकी कोकण विभागात 54 केंद्र गुरुवारी सुरू करण्यात आली.
“प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या“ लोकार्पण प्रसंगी कोंकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पनवेल केंद्रावर उपस्थित राहून दृकश्राव्य प्रणालीव्दारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक हे दृक श्राव्य प्रणाली माध्यमाद्वारे उपस्थित होते. पनवेल केंद्र येथून आमदार प्रशांत ठाकूर, उप आयुक्त (विकास) गिरीश भालेराव, उप आयुक्त कौशल्य विकास डी.डी.पवार, उप आयुक्त पनवेल महानगरपालिका कैलाश गावडे, प्रगती स्किल डेव्हलपमेंटचे संचालक चव्हाण तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची ही संकल्पना महत्त्वाची असून, भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. ही केंद्र 34 जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत. कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात 9, पालघर जिल्ह्यात 12, रायगड जिल्ह्यात 14, रत्नागिरी जिल्ह्यात 11, तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात 8 अशा एकूण 54 कौशल्य विकास केंद्रांचे एकाच वेळी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले.
कोकण विभागातील कौशल्य विकास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कौशल्य अधिकारी आणि अन्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थी/ विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai