81% मुलांनी घेतला पोलिओचा डोस
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2023
- 390
नवी मुंबई ः महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शना खाली रविवारी 10 डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी रितीने राबविण्यात आली. नवी मुंबई पालिकेच्या 24 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ, टोल नाके इत्यादी विविध ठिकाणी 605 स्थायी, 93 ट्रांझिट व 27 मोबाईल असे एकूण 725 पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले.
‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' - या घोषवाक्यास अनुसरून घरोघरी जाऊन नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून पोलिओ लसीकरण मोहीमेची माहिती पोहचविण्यात आली. लसीकरण बूथवरील 2 हजारहून अधिक कर्मचारी, स्वयंसेवकामार्फत लस पाजण्यात आली. नवी मुंबई कार्यक्षेत्रात एकूण 81% इतक्या बालकांना लस पाजण्याचे काम पूर्ण झाले. तथापि काही कारणांमुळे ज्या अपेक्षित लाभार्थी बालकांचे लसीकरण होऊ शकले नाही त्यांना दि. 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai