पोलीसांच्या पाल्यांना मिळाला रोजगार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 30, 2023
- 405
नवी मुंबई ः पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजीत राज्यातील पहिल्या रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. 100 पेक्षा जास्त कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला होता. मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील 1 हजार पेक्षा जास्त पाल्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेमधून नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये या मेळाव्याचे आयोजन केले होते. ठाणे बेलापूर व तळोजा एमआयडीसीसह शहरातील अनेक नामांकीत कंपन्यांनी पोलिसांच्या मुलांना रोजगार देण्याची तयारी दर्शवून यामध्ये सहभाग घेतला होता. विविध कंपन्यांमधील 1980 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी नवी मुंबई, मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पोलिसांच्या मुलांनी अर्ज केला होता. राज्य राखीव दल व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांनीही अर्ज केले होते. एक हजार पेक्षा जास्त पाल्यांना एका दिवसामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात प्रथमच पोलीस दलामधील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी अशाप्रकारे रोजगार मेळावा आयोजीत केला होता. या उपक्रमाविषयी पोलिसांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी सांगितले की 24 तास कर्तव्य बजावण्यात व्यस्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मुलांसाठी फारसा वेळ देता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची रोजगाराची चिंता कमी करण्यासाठी यावर्षीपासून रोजगार मेळावा आयोजीत केला असल्याचे सांगितले. मुख्यालय उपायुक्त संयकुमार पाटील यांनी या मेळाव्यामागील उद्देश व पोलिस कल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. यावेळी अतीरिक्त पोलीस आयुक्त दिपक साकोरे, उपायुक्त अमीत काळे, पंकज डहाणे, विवेक पानसरे, अमीत काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांच्या पाल्यांना उत्तम दर्जाचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. भविष्यात कौशल्य प्रशिक्षणावरही भर देण्यात येणार असून राज्यभर उत्तम दर्जाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई नवी मुंबई
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai