शहरप्रमुखपदी राकेश मोरे यांची नियुक्ती
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 30, 2023
- 444
नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने नवी मुंबईतील विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती बुधवार 27 डिसेंबर रोजी करण्यात आली. तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पदोन्नती जाहीर करण्यात आली. वाशी शहरप्रमुखपदी सक्रिय कार्यकर्ते राकेश मोरे यांची नियुक्ती झाल्याने शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
काही महिन्यांवर होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत पुनर्रचना केली जात आहे. उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असून धडाडीच्या आणि क्रियाशील कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे वाटप करण्यात येत आहेत. तुर्भे-सानपाडा उपजिल्हाप्रमुखपदी प्रकाश पाटील, नेरूळ पूर्व व पश्चिम उपजिल्हाप्रमुखपदी संतोष घोसाळकर, नेरूळ पश्चिम शहरप्रमुखपदी काशिनाथ पवार यांना संधी देण्यात आली आहे. या सर्वांना बुधवारी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai