सुपर सब-ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 17, 2024
- 326
फादर ॲग्नल स्कुल जनरल चॅम्पियनशिप विजेते
नवी मुंबई ः गोल क्वेस्ट फाऊंडेशन, नवी मुंबई या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देऊन विविध खेळांतील होतकरु खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्य केले जात आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रथमच नवी मुंबईमध्ये अगदी 06, 08,10,12 वर्षाआतील मुलामुलींकरिता ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 1600 हून अधिक मुलामुलींनी सहभाग घेतला होता.
आजमितीस लहान वयोगटातील मुलांमध्ये खेळण्याकडे कल कमी होत असून स्मार्ट फोनवर खेळण्यामध्ये जास्त कल दिसून येत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक तज्ञ यावर चिंता व्यक्त करत असून यावर मात करण्यासाठी मुलांना मैदानावर आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लहान वयातील मुलांसाठी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन भारतरत्न स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर-3, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई येथे करण्यात आले. या स्पर्धेचा शुभारंभ तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार विजेता आंतराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी यांच्या हस्ते पार पडला. शुभारंभाप्रसंगी मनोगतात त्यांनी प्रत्येक मुलामुलींनी लहान वयात खेळामध्ये सहभागी व्हायलाच हवे असे सांगत पदक मिळविण्यासाठी नव्हे तर स्वत:ला तपासून बघण्यासाठी आणि त्यामधून ध्येय ठरवून सिध्द करुन दाखण्यासाठी खेळायला हवे असे सांगितले. या कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया बेलापूर शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक अलोककुमार, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष धनंजय वनमाळी, ज्येष्ठ पत्रकार नामदेव मोरे, नवी मुंबई मनपा क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, संस्थेचे ट्रस्टी किरण तावडे, सिध्दाराम दहिवडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतील निकाल- 06 वर्षाआतील मुली- 50 मी.रन प्रथम- राधवी जाधव, व्दितीय- इनया शेख, तृतीय- अलिना शेख, स्टॅडिंग ब्रॉड जंम्प प्रथम- अलिना शेख, व्दितीय- इनया शेख, तृतीय- नेहल मिश्रा, 450 मी. रिले प्रथम- अंजुमन इस्लाम स्कुल,वाशी व्दितीय- न्यु होरायझन वर्ल्ड अकॅडमी,कोपरखैरणे. तृतीय रायन इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ.
06 वर्षाआतील मुले- 50 मी.रन प्रथम- मुथा आगम, व्दितीय- आहान शेख, तृतीय- शौर्य सिंग, स्टॅडिंग ब्रॉड जंम्प प्रथम- शिवांश् चौधरी, व्दितीय- साईयो आलम सोबूल, तृतीय- आहान शेख, 450 मी. रिले प्रथम- अंजुमन इस्लाम स्कुल,वाशी व्दितीय- नमुंमपा शाळा क्र.93,नेरुळ. तृतीय न्यु होरायझन वर्ल्ड अकॅडमी,कोपरखैरणे. 08 वर्षाआतील मुली- 50 मी.रन प्रथम- सुहाना गफार, व्दितीय- रेहा मांजरे, तृतीय- वर्षा राज, 80 मी. रन प्रथम- सुहाना गफार, व्दितीय- रेहा मांजरेकर, तृतीय- काव्या कुमारी. लांब उडी प्रथम- रेहा मांजरे, व्दितीय- काव्या कुमारी, तृतीय- अनन्या जाधव, 450 मी. रिले प्रथम- डॉन बॉस्को स्कुल, नेरुळ. व्दितीय- अंजुमन इस्लाम स्कुल, वाशी. तृतीय रायन इंटरनॅशनल स्कुल, खारघर. 08 वर्षाआतील मुले- 50 मी.रन प्रथम- झिदान बघोई, व्दितीय- रेयांश मारंजे, तृतीय- हूसेन मो. इशान, 80 मी. रन प्रथम- तुषार परमार, व्दितीय- हूसेन मो. इशान, तृतीय- इशांन तेली. लांब उडी प्रथम- मो.गुलाम मो.शरीफ, व्दितीय- स्वराज वास्कर, तृतीय- नरेश देवाशी, 450 मी. रिले प्रथम- अंजुमन इस्लाम स्कुल, वाशी. व्दितीय- फा. ॲग्नल स्कुल,वाशी. तृतीय रायन क्रेिश्चन स्कुल, वाशी.
10 वर्षाआतील मुली- 60 मी.रन प्रथम- प्रिशा सिंग, व्दितीय- प्रिया घोडके, तृतीय- आद्या गुरव, 100 मी.रन प्रथम- प्रिशा सिंग, व्दितीय- प्रियल घोडके, तृतीय- गौरी मयेकर. लांब उडी प्रथम- प्रियल घोडके, व्दितीय- वंशिका राणा, तृतीय- शगुन सिंग, 4100 मी. रिले प्रथम- सेंट झेवियर्स हायस्कुल, ऐरोली. व्दितीय- फा. ॲग्नल मल्टीपरपज स्कुल, वाशी. तृतीय रायन इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ.
10 वर्षाआतील मुले- 60 मी.रन प्रथम- रिदान बेहडा, व्दितीय- ब्रियान संगमा, तृतीय- निकुंज ठाकुर, 100 मी.रन प्रथम- रिदान बेहडा, व्दितीय- प्रियांशू सागर, तृतीय- ब्रियान संगमा. लांब उडी प्रथम- रिदान बेहडा, व्दितीय- भावेश पटेल, तृतीय- रोहन वरगिस, 4100 मी. रिले प्रथम- फा. ॲग्नल मल्टीपरपज स्कुल, वाशी. व्दितीय- रायन क्रिश्चन स्कुल,वाशी. तृतीय रायन इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ.
12 वर्षाआतील मुली- 100 मी.रन प्रथम- राधीका भोसले, व्दितीय- सारा घोड, तृतीय- सई मोरे, 200 मी. रन प्रथम- राधीका भोसले, व्दितीय- मिष्टी पांडे, तृतीय- सारा घोड. लांब उडी प्रथम- सारा घोड, व्दितीय- सई मोरे, तृतीय- भावी राणा, गोळा फेक- प्रथम- व्दिशा यलनानंची, व्दितीय- ज्योत्सना सिंग, तृतीय- वेदिका पवार, 4100 मी. रिले प्रथम- रायन इंटरनॅशनल स्कुल,खारघर. व्दितीय- फा. ॲग्नल मल्टीपरपज स्कुल, वाशी. तृतीय सेंट झेवियर्स हायस्कुल,ऐरोली.
12 वर्षाआतील मुले- 100 मी.रन प्रथम-अर्जुन सिंग,व्दितीय- कर्तव्य पाल,तृतीय- आर्यन वाकोडे, 200 मी. रन प्रथम- अर्जुन सिंग, व्दितीय- हर्षित निकम, तृतीय- कर्तव्य पाल. लांब उडी- प्रथम- आर्यन वाकोडे, व्दितीय- शौर्य जाधव, तृतीय- तेजस जाधव, गोळा फेक- प्रथम- रुद्र बेलकर, व्दितीय- हर्षित निकम, तृतीय- यशवीर शर्मा, 4100 मी. रिले प्रथम- न्यु होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली. व्दितीय- सेंट झेवियर्स हायस्कुल,ऐरोली. तृतीय फा. ॲग्नल मल्टीपरपज स्कुल, वाशी.
या स्पर्धा सी.बी.डी.बेलापुर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्यांना ऑलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्स मध्ये ज्यांनी संपूर्ण जगभरात भारत देशाचे नावलौकीक केले असे अर्जुन पुरस्कार प्राप्त ललिता बाबर उप आयुक्त क्रीडा विभाग, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या शुभहस्ते मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अशा स्वरुपाचे लहानमुलांसाठी स्पर्धा आयोजन केल्याने समाधान व्यक्त करुन यातुनच उदयाचे पदकविजेते खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक व राष्ट्रीय खेळाडू विष्णू परब, सुरेश सी.एस. राणाजी- ओनर ट्रायडेंट लॉजिस्टीक, महेश पटेल, शूटिंगबॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनिल मोरे यांच्या शुभहस्ते विविध गटातील विजेत्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी 108 ही ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने त्यांचे सुध्दा आभार मानत या स्पर्धेतील अंतीम जनरल चॅम्पियनशिप प्रथम- फा.ॲग्नल मल्टीपरपज स्कुल,वाशी. व्दितीय- अंजुमन इस्लाम स्कुल, वाशी,तृतीय- डॉन बॉस्को स्कुल, नेरुळ या विजेत्या शाळांना चषक देऊन सन्मान करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai