पाच वर्ष अर्थसंकल्पात करवाढ करू नये
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2024
- 336
आमदार गणेश नाईक यांची आयुक्तांना सूचना
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून 20 किंवा 21 फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प 4957 कोटींपर्यंत असेल अशी चर्चा आहे. महापालिकेने 2024-25च्या अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षे कोणताही मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढवू नये, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या अर्थसंकल्पात शहर विकास, सोयी-सुविधा आणि भविष्यकालीन गरजा पाहता आमदार गणेश नाईक यांनी मौलिक सूचना केल्या आहेत.
आमदार गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार नवी मुंबईकरांवर मागील 24 वर्षे कोणताही करवाढीचा बोजा लादण्यात आलेला नाही. मागील वर्षी प्रशासकीय काळात देखील करवाढ करण्यात आली नव्हती. यापुढेही हा करदिलासा सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्ताकडे केली आहे. नवी मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. या लोकसंख्येला पुरेल इतका पाणीसाठा भविष्यात लागणार आहे. नवी मुंबईची भविष्यकालीन पाण्याची गरज भागवण्यासाठी भिरा हायड्रो एक हजार एमएलडी पाणी योजना आमदार गणेश नाईक यांनी सुचवली असून या योजनेसाठी देखील बजेटमध्ये भरीव तरतूद करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai