नोटा बदलण्याच्या बहाण्याने दिड लाखांचा गंडा
- by Aajchi Navi Mumbai
- May 07, 2024
- 278
नवी मुंबई : सीबीडी येथील आरबीआयमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडील 1 लाख 60 हजाराच्या नोटा बदलण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील नोटा पळवल्या आहेत. याप्रकरणी दोघांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
दोन हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर दिलेली मुदत उलटूनही आरबीआय मध्ये अद्यापही नोटा बदलून दिल्या जात आहेत. त्यामुळे सीबीडी येथील आरबीआय बाहेर नियमित सकाळी नोटा बदलण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामध्ये बहुतांश व्यक्ती ह्या मुंबई, ठाणे परिसरातून येत असतात. अशाच प्रकारे वडाळा येथे राहणारे गोकुळ गुप्ता (70) हे शनिवारी त्यांच्याकडील दोन हजार रुपये किमतीच्या 80 नोटा घेऊन बदलण्यासाठी आरबीआय येथे आले होते. यावेळी ते रांगेत उभे असताना एक पुरुष व महिलेसोबत त्यांची ओळख झाली. त्यांनी गुप्ता यांना नोटा बदलून देण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्या स्वतःकडे घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र संधी मिळताच दोघांनी तिथून पोबारा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले. यामुळे घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावरून शनिवारी रात्री दोघांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai