आ.मंदाताई म्हात्रे यांच्यावतीने छत्री वाटप
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2024
- 319
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन धूमधडाक्यात सुरु आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी वाशी येथील ज्येष्ठ नागरिक व महिला यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून मोफत छत्री वाटप करण्यात आले.
आ. म्हात्रे यांनी या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देत सुधा राणी जैन व वाशी विरंगुळा केंद्रातील नागरिकांसोबत वेळ घालविला. वाशी येथील ज्येष्ठ नागरिक व महिला यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून वस्तू रुपात दर वेळेस साहित्य उपलब्ध होते. आज छत्री मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आ. म्हात्रे यांच्या या सामाजिक उपक्रमाने नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत समाजसेवक विकास सोरटे, हम्मद खान (पाशाभाई),प्रताप बोसकर, मुकुंद विश्वासराव, प्रविण चिकने, प्रमिला खडसे, मालती सोनी, वर्षा झरेकर, सुवर्णा चिकने, वाशी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai