Breaking News
उरण ः लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पनवेल व अविनाश म्हात्रे (पाले) व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन, ता.उरण.(कृ.द. जोशी सभागृह) येथे भव्य दिव्य असे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास बेरोजगारांसह पालकांचाही या मेळाव्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी 82 इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी शिक्षण, अनुभव, कौशल्य बघून एकूण 30 जणांची नोकरी साठी निवड झाली आहे.
उरण तालुक्यात त्यातही ग्रामीण भागात पहिल्यांदाच बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी 233 उमेदवारांनी नाव नोंदणी केली होती. विविध विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लिंक द्वारे नाव नोंदणी केली होती. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात आले आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवाऱ्याच्या नोंदणी व प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. सदर सुवर्णसंधीचा संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात घेतला. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन, ता. उरण. (कृ.द. जोशी सभागृह) येथे हा रोजगार मेळावा मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला. उपस्थित 82 इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी शिक्षण, अनुभव, कौशल्य बघून एकूण 30 जणांची नोकरी साठी निवड झाली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai