Breaking News
उरण ः नवी मुंबईच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडत, प्रथमच महेरिटेज व फोटोवॉकफचे आयोजन 25 मे रोजी उरण येथे करण्यात आले. या वारसादर्शन व छायाचित्रण फेरीसाठी मुंबई, पुणे,खारघर, उलवे नवी मुंबई, उरण येथील रहिवासी तसेच इतिहास अभ्यासक, उत्सुक तसेच उरण बद्दल आस्था असणारे अनेकजण उपस्थित होते.
हेरिटेज वॉक ही अभिनव संकल्पना उरणमधील निसर्ग पर्यटन तसेच ऐतिहासिक पर्यटन वाढीस लागावे म्हणून निकेतन रमेश ठाकूर यांनी, फेसबुकवरील मआठवणीतले उरणफ या ग्रुपच्या माध्यमातून मांडली होती. त्याला अनेक लोकांची पसंती आली होती. उत्सुकांनी या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीसाठी उपस्थिती दाखविली होती. निकेतन रमेश ठाकूर (बोकडविरा) आणि वेदांत श्रीकांत पाठक(बोरी) या दोन नवतरुणानी ही संकल्पना श्री गोपाळकृष्ण वाचनालय, देऊळवाडी यांच्या मार्फत प्रत्यक्षात उतरवली असून, यामार्फत उरणच्या समृद्ध सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसाची ओळख करून दिली. या वारसादर्शन व छायाचित्रण फेरीसाठी मुंबई, पुणे,खारघर, उलवे नवी मुंबई येथील तसेच उरणमधील काही रहिवासी तसेच इतिहास अभ्यासक, उत्सुक तसेच उरण बद्दल आस्था असणारे नागरिक उपस्थित होते. मआठवणीतले उरणफ ही वारसा दर्शन व छायाचित्रण फेरी पूर्णपणे मोफत होती व प्रायोगिक तत्वावर सहभागींना देऊळवाडीमधील सर्व ऐतिहासिक मंदिरे त्यांचा इतिहास, मंदिर स्थापत्यशैली तसेच त्या मंदिरांतील धार्मिक महत्व, सणसमारंभ यांची माहिती सांगितली. श्री गोपाळकृष्ण वाचनालय जे 81 वर्ष जुने आहे त्यांचे सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच ग्रंथपाल व ग्रंथालय कर्मचारीवृंद यांनी अशा नवोपक्रम कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. विमला तलाव, एन.आय हायस्कूल, भिवंडीवाला बाग व प्राणिसंग्रहालय, ब्रिटिशकालीन भिवंडीवाला वॉटर वर्क्स व राजमहाल सिनेमागृह यांची माहिती सांगण्यात आली. श्री गोपाळकृष्ण वाचनालयात ग्रंथालयातर्फे अनेक दुमळ पुस्तकांचे व निकेतन ठाकूर यांनी पोस्ट कार्ड तसेच पोस्ट स्टॅम्प व उरणच्या आठवणींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते. सर्व उपस्थितांना या कार्यक्रमाची संस्मरणीय आठवण म्हणून खास या कार्यक्रमासाठी तयार केलेले पोस्टकार्ड व बुकमार्क मोफत वितरीत केले.
या वॉकद्वारे सहभागींच्या कॅमेऱ्यात केवळ फोटो नव्हे, तर उरणच्या इतिहासाच्या असंख्य आठवणीही बंदिस्त झाल्या आहेत. ‘छेीं क्षीीं र ुरश्रज्ञ रप शुशीिळशपलश ूेफश्रश्र ीशाशालशी‘ हे ब्रीदवाक्य असलेली ही सफर केवळ उरणच्या वाटांवरची नाही, तर इतिहासाच्या खुणा शोधण्याची एक अविस्मरणीय संधी होती अशा भावना उपस्थितीत असलेल्या सदस्यांनी व्यक्त केल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai